आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकतील चौथ्या दिवशी द ओव्हल स्टेडियमवर आयपीएलचेही चाहते दिसले आहेत. या चाहत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत चाहते आयपीएलचा सुप्रसिद्ध संघ चेन्नई सुपर किंग्जच्या नावाने नारेबाजी करताना दिसत आहेत. त्यांनी ही नारेबाजी इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याला पाहून केली आहे.
इंग्लंडचा खेळाडू मोईन अली सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) चाहते सीएसके-सीएसके अशी नारेबाजी करू लागले. चाहत्यांच्या या नारेबाजीवर मोईन अलीनेही त्यांना प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिडिओत दिसत आहे, जेव्हा चाहते सीएसके-सीएसके असे नारे देत आहेत. तेव्हा मोईन अलीने मागे वळून त्यांना प्रतिक्रिया देत थम्स अप दाखवले आहे. मोईन अलीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मोईन अली आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळतो आहे. आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावामध्ये सीएसकेने त्याला ७ कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे. या लिलावासाठी त्याची बेस प्राइस २ कोटी रुपये होती.
CSK 💛 CSK Chants in #ENGvsIND@ChennaiIPL Fan 💛
pic.twitter.com/s8ybjlPlfD— Hari MSDian™ (@itzHariMsd) September 3, 2021
आयपीएलच्या यूएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या उर्वरित सामन्यांपैकी पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. सीएसकेने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. सीएसकेने या हंगामात ७ सामने खेळले असून त्यातील ५ सामने जिंकले आहेत. यासह संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात सीएसकेने खूपच खराब प्रदर्शन केले होते. संघ त्यावेळी प्लेऑफ सामन्यांपर्यंतही पोहचला नव्हता.
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला असून पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत झाला होता. मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून सुरू झाला असून हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवेल. ही मालिका संपल्यानंतर उभय संघातील खेळाडू आयपीएलसाठी युएईला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बेटा, तू फक्त मोहालीत असं करून दाखव, मग पाहा’; वारंवार मैदानात घुसणाऱ्या जार्वोला सेहवागचा इशारा
रोहितचा झेल तर क्लास होताच; पण त्यानंतर कोहली, पंत अन् राहुलने केलेले सेलिब्रेशन पाहिले का?
मोठी संधी गमावली, तिसऱ्याच षटकात बर्न्समुळे रोहितला जीवनदान; आता सलामीवीर उडवणार धुरळा…!