भारत आणि इंग्लंड यांच्यात २ सप्टेंबरपासून चौथा कसोटी सामना द ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. संघाने सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्वबाद ४६६ धावा केल्या असून इंग्लंड संघावर ३६८ धावांची आघाडी मिळवली आहे. इंग्लंडवर सामना वाचवण्याचा दबाव निर्माण झाला असून चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने बिनबाद ७७ धावा केल्या आहेत. सामन्याच्या पहिल्या डावात महत्वाची खेळी करणारा शार्दुल ठाकुरने दुसऱ्या डावातही अर्धशतक केले आणि रिषभ पंतसोबत संघासाठी शतकी भागीदारी पार पाडली. पंतनेही चौथ्या दिवसी त्याचे अर्थशतक पूर्ण केले.
शार्दुल आणि पंत यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सामन्यादरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या हातून एक मोठी चूक झाली. त्याची ही चूक इंग्लंडच्या संघाला खूप महागात पडली आहे. ही घटना भारताच्या फलंदाजीवेळी १३२ व्या षटकादरम्यान घडली.
ओली राॅबिंसन गोलंदाजी करत होता. यावेळी रिषभ पंतने त्याच्या एका चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत आला होता. इंग्लंड संघाकडे त्याला बाद करण्याची नामी संधी होती. ३० यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करणारा मोईन अली खूपच सतर्क होता आणि त्याने तो चेंडू पटकन पकडला. ताबडतोब त्याने तो चेंडू डायरेक्ट हिटसुद्धा केला, पण तो यष्टीला लागू शकला नाही.
तरीही यष्टीच्या दुसऱ्या बाजूने म्हणजेच बॅकअपला उभा असलेल्या हसूब हमीदकडेही पंतला धावबाद करण्याची संधी होती. हमीदने चेंडू पकडेपर्यंत यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोही पटकन यष्टीकडे धावत आला होता. पंतला क्रिजवरील सीमारेषेपर्यंत पोहोचण्यासाठी अजून वेळ होता. पण इतक्यात हमीदच्याही हातून चेंडू निसटला आणि पंतने सीमारेषे गाठला. सुरुवातीला अगदी पंतनेही क्रिजवर पुन्हा पोहोचण्याची आशाचं सोडली होती. मात्र, इंग्लंड संघाचे दुर्दैव असे की, त्याला जीवनदान मिळाले.
#RishabhPant runout miss by #moeenali 😂😂#INDvENG #ENGvsIND #shardulthakur #LordShardul #kohli #runout pic.twitter.com/rCxN6u1qdR
— Safemoon_India🇮🇳 ❁ (@Safemoon4_India) September 5, 2021
सामन्यातील या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतला सामन्यात मिळालेल्या या जीवनदानाचा त्याने चांगला उपयोग केला आणि त्याचा डावा अर्थशतकापर्यंत घेऊन गेला. या प्रसंगावेळी ३८ धावांवर खेळत असलेल्या पंतने पुढे झटपट धावा काढल्या आणि ५० धावा फलकावर लावल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
शतक झळकावल्यानंतर ‘हिटमॅन’ रोहितला ओव्हलच्या मैदानावर मिळाला विशेष सन्मान, पाहा फोटो
मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे टॉप ३ खेळाडू; एका भारतीय खेळाडूचाही समावेश
रनमशीन कोहलीसाठी ‘या’ गोलंदाजांची फिरकी ठरतेय डोकेदुखी, सर्वाधिकवेळा झालाय बाद