इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला खेळला जाणार आहे. मलिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता येता तिसरा सामना हेडिंग्ले (लीड्स) मैदानावर खेळला जाणार आहे. तिसरा सामना सुरू होण्याआधी संघातील खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत. हेडिंग्लेमध्ये पोहोचल्यावर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याचा एक फोटो शेअर केला आहे, त्याचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.
पंतने शेअर केलेल्या फोटोत त्याने आकाशी रंगाची हुडी आणि खाली शाॅर्ट्स घातलेले दिसत आहे. त्याने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वर्गातील सर्वात सभ्य मुलगा.”
https://www.instagram.com/p/CS4Du6FNoP2/?utm_source=ig_web_button_share_sheet
त्याच्या या फोटोवर भारतीय खेळाडू अक्षर पटेलने कमेंट केली आहे. कमेंटमध्ये अक्षर पटेलने लिहिले आहे की, “सभ्य मुलगा तो आहे जो फोटो घेत होता.” रिषभ पंतचा हा फोटो अक्षर पटेलने काढला आहे, त्यामुळे त्याने अशी कमेंट केली आहे. त्यानंतर अक्षरने केलेल्या कमेंटला ईशांत शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. इशांतने लिहिले आहे, “पटेल बापू सभ्य आणि तुही, व्वा चांगली गोष्ट आहे.”
Seems like we've entered the wrong backbenchers group chat 😌💬#YehHaiNayiDilli pic.twitter.com/K9cVuLsjSD
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 23, 2021
तिसऱ्या कसोटी सामन्यात पंतकडे एक विक्रम त्याच्या नावावर करण्याची संधी आहे. यावर्षी पंतने आतापर्यंत कसोटी सामन्यांत १५ षटकार मारले आहेत. २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १६ षटकार मारले होते. म्हणजे आता तिसऱ्या कसोटीत २ षटकार मारल्यानंतर तो २ दोन वर्षांपूर्वीचा आपलाच एका कँलेडर वर्षातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम तोडू शकतो.
रोहित शर्माकडे आहे कपिल देवचा विक्रम मोडण्याची संधी
लीड्सवर रोहितकडे कपिल देवसारख्या मोठ्या दिग्गजाचा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६१ षटकार मारले आहेत. तसेच कपिल देवनेही त्याच्या कसोटी कारकिर्दीत १३१ सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. तिसऱ्या कसोटीत जर रोहित एक षटकार मारू शकला. तर तो कपिल देवचा विक्रम मोडेल. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज वीरेंद्र सेहवाग आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९१ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जो रूट चुकला, मग प्रशिक्षकांनी त्याला रणनिती बदलण्यास का सांगितले नाही?’; माजी क्रिकेटरचा निशाणा
मोठी बातमी! इंग्लंड संघाला जबर धक्का; ‘हा’ दिग्गज खेळाडू तिसऱ्या कसोटीतून बाहेर
शून्य अनुभव असूनही ‘विराटसेना’ करणार लीड्स कसोटी फत्ते! गाळतेय भरपूर घाम