इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा चौथा सामना २ सप्टेंबरपासून लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसले होते. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ सामन्यात पिछाडीवर पडला होता. इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना पटापट बाद केल्यानंतर मध्यक्रमातील फलंदाज ओली पोप याने दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांसमोर चांगलेच आव्हान उभे केले होते. पण अखेर शार्दुल ठाकूरमुळे त्याच्या शतकाच्या दिशेने चाललेल्या खेळीवर अंकुश लागला.
पोप ८१ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने केलेल्या या मोठ्या धावसंखेमुळे इंग्लंड संघ त्यांच्या पहिल्या डावात २९० धावा करू शकला आणि इंग्लंडने पहिल्या डावात भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी मिळवली आहे.
इंग्लंडचा फलंदाज पोपचे घरचे मैदान असलेल्या द ओव्हल स्टेडियमवर हा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. त्याने या सामन्यात चांगली खेळी केली असून त्याच्या चाहत्यांना खुश केले आहे. त्याने या सामन्यात आप्रतिम खेळी केली असली तरीही, तो या सामन्यात ज्याप्रकारे बाद झाला, त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले असतील. त्याने केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याचे या सामन्यातील शतकही हुकले आहे.
जेव्हा पोप ८१ धावांवर खेळत होता, तेव्हा असे वाटत होते की त्याला बाद करणे आता भारतीय गोलंदाजांना फारच कठीण जाईल. मात्र, अशातच शार्दुल ठाकुरच्या ऑफ स्टंपच्या बाहेर चाललेल्या चेंडूला खेळण्याच्या प्रयत्नात त्याने त्याची विकेट गमावला. चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करून स्टंप्सवर जाऊन धडकला आणि अशा प्रकारे त्याने त्याची विकेट गमावलीच. मात्र, त्याची शतक करण्याची संधीही गेली. पण भारतीय संघाला याचा मोठा फायदा झाला.
Shardul Thakur chops on Ollie Pope, Shardul delivers when the team required. pic.twitter.com/PAlyHcWvue
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2021
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद ४३ धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंड भारतापेक्षा ५६ धावांनी आघाडीवर आहे. रोहित शर्मा २० आणि केएल राहुल २२ धावांसह मैदानात टिकून आहेत. त्यामुळे भारतीय संघाला जर सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर अशीच चांगली खेळी कायम ठेवावी लागेल आणि तिसऱ्या दिवशी २०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घ्यावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी संधी गमावली, तिसऱ्याच षटकात बर्न्समुळे रोहितला जीवनदान; आता सलामीवीर उडवणार धुरळा…!
वेगवान गोलंदाज अँडरसनचे फलंदाजीत अनोखे ‘शतक’, भल्याभल्यांनाही नाही जमला हा पराक्रम
भारताकडून घोडचूक, मोईन बाद होऊनही केली नाही अपील; इंग्लंडला फुकटात मिळाल्या ७२ धावा!