---Advertisement---

लॉर्ड्सवरील विजयानंतर विरुष्काचा लंडनमध्ये ‘वेजिटेरियन लंच’; एका व्यक्तीला सर्वांनी केले खूप मिस

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 8:34 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून तिसऱ्या सामन्याच्या आधी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघे रेस्टाॅरेंटमध्ये दुपारचे जेवण करण्यासाठी पोहोचले. हे दोघे वेस्टमिंस्टर स्थित टेंड्रील किचन नावाच्या रेस्टाॅरेंटमध्ये गेले होते. येथील जेवण अनुष्काला खूप आवडले. रेस्टाॅरेंटच्या इंस्टाग्राम पेजवर विराट आणि अनुष्का यांचा फोटो शेयर करण्यात आला आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

सध्या अनुष्का बाॅलीवुडपासून लांब इंग्लंडमध्ये तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. हे दोघे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सोबत इंग्लंड दौऱ्यावर गेले आहेत. लाॅर्ड्सवरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर विराटचे लक्ष आता २५ ऑगस्टपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर आहे.

तिसऱ्या सामन्याआधी विराट आणि अनुष्का एकत्र जेवनाचा आनंद घेण्यासाठी रेस्टाॅरेंटमध्ये पोहचले. विराट कोहलीही शाकाहारी आहे त्यामुळे हे दोघे टेंड्रील किचन नावाच्या एका शाकाहारी रेस्टाॅरेंटमध्ये गेले होते.

अनुष्काला येथील जेवण एवढे आवडले आहे की, ती या जेवणाचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जेवणाच्या डिशचा फोटो शेयर करत लिहिले आहे की, आजपर्यंतचे सर्वात स्वादिष्ट शाकाहारी जेवण. फोटोत विराट आणि अनुष्का रेस्टाॅरेंटच्या शेफसोबत उभा राहिलेले दिसत आहेत. अनुष्का शर्मा पांढऱ्या रंगाचा स्वेटर आणि निळ्या रंगाची जीन्समध्ये दिसत आहे.  विराट क्रिम रंगाची पॅन्ट आणि गुलाबी रंगाच्या टी-शर्टवर दिसत आहे. फोटोत विराट आणि अनुष्कासोबतच शेफनेही तोंडावर मास्क लावले आहे. मात्र त्यांच्यासोबत मुलगी वामिका मात्र दिसली नाही.

https://www.instagram.com/p/CSuWbdxK_zo/?utm_source=ig_web_button_share_sheet

भारताचा इंग्लंड दौरा हा जास्त काळाचा असल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना दौऱ्यावर परिवारासोबत जाण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यानंतर कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका कोहलीच्या सोबत मागच्या २ महिन्यांपासून इंग्लंडमध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---