भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तीन सामने खेळले गेले असून मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (२ स्पटेंबर) सुरू झाला आहे. मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीवर असून त्यांचा चौथ्या सामन्यानंतर आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसले आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांवार गुंडाळला आहे. सध्या इंग्लंडचा संघ मैदानात फलंदाजी करत आहे. अशात चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसी एकत्र मैदानात दिसल्या आहेत.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसी एकत्र द ओव्हल मैदानावर दिसल्या आहेत. त्या सगळ्या एकत्र सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानात आल्या होत्या. इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंगने त्यांच्या एक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. यामध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मापासून ते आर अश्विनची पत्नी प्रीथी नारायणनपर्यंत बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि प्रेयसी दिसत आहेत.
क्रिकेटप्रेमींना हे चित्र क्वचितच याआधी पाहायला मिळाले असावे. दरम्यान तिने शेअर केलेली ही इंस्टग्राम पोस्ट चाहत्यांना खूपच आवडलेली आहे. चाहते तिच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
https://www.instagram.com/p/CTUdpGCsU1s/?utm_source=ig_web_button_share_sheet
कर्णधार कोहलीचे संयमी अर्धशतक
कर्णधार कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. कोहलीने त्याचे कसोटीमधील शेवटचे शतक २०१९ नोव्हेंबरमध्ये केले होते. असे असले तरीही, त्याच्याकडून आणखी चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापाण्यापर्यंत इंग्लंडच्या गोलंदाजांनी १२२ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान कर्णधार कोहलीने ९६ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या आणि बाद झाला होता. तो या सामन्यात काही चांगले कवर ड्राइव खेळतानाही दिसला. मात्र, ओली राॅबिनसनच्या चेंडूवर त्याने जाॅनी बेयरस्टोच्या हातात अलगद झेल दिली आणि बाद झाला.
सामन्यात याआधी क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवेळी जो रूटच्या हातातून त्याचा झेल सुटला होता. मात्र त्याचे इंग्लंडला जास्त नुकसान झाले नाही. कारण पुढे कोहलीने काही चेंडू खेळल्यानंतर ऑफ स्टंप्सच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याची विकेट गमावली.
अश्विनला संघाबाहेर ठेवल्याने कर्णधार टीकेचा धनी
रविचंद्रन अश्विनला चौथ्या सामन्यात संघात सामील केले गेले नाही. ओव्हलवर शेवटच्या दिवसात फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. तरीही त्याने अश्विनला पुन्हा बाकावर बसवल्याने कोहलीवर टीका होत असून या सामन्यात चांगले प्रदर्शन करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. मात्र तो अपेक्षेप्रमाणे तीन आकडी धावसंख्या करू शकला नाही.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३ विकेट्स गमावले असून ५३ धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत आणि सामन्यात संघाची स्थिती मजबूत करत आहेत. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन कसे असेल? याच्यावर सामन्याची पुढची दिशा ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या भेदकतेपुढे शार्दुलचे झंझावती अर्धशतक, त्याच्या धमाकेदार खेळीमागे ‘हे’ आहे गुपित
ना जोरदार जल्लोष, ना आक्रमक प्रतिक्रिया; इंग्लंडविरुद्ध जसप्रीत बुमराहची ‘शांतीत क्रांती’
रहाणे पुन्हा अपयशी; पण कोहलीच्या अचूक निर्णयाला पाहून म्हणावचं लागेल, ‘हळूहळू जमतय..’!