---Advertisement---

‘इंग्लंड सामना जिंकल्यास कोहली जबाबदार’, भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सांगितले

Virendra-Sehwag
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा पाचवा सामना बर्मिंघमच्या एजबस्टनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाला. विराट आणि बेयरस्टो यांच्यातील वादावर आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग व्यक्त झाला आहे.

विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून नेहमीच व्यक्त होत असतो. अलिकडच्या काळात तो सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याच्यात जो वाद झाला, त्यावरही सेहवाग व्यक्त झाला आहे. सेहवागच्या मते विराटने बेयरस्टोसोबत वाद घातल्यामुळे तो अधिक आक्रामकपणे खेळू लागला आणि पुढे शतक देखील पूर्ण केले.

सेहवाने ट्वीटरच्या माध्यमातून असे सांगितेल की, विराटने बेयरस्टोसोबत स्लेजिंग करून बरोबर केले नाही. त्याला ट्वीटमध्ये लिहिले की, विराट कोहलीने स्लेजिंग करण्यापूर्वी जॉनी बेयरस्टोचा स्ट्राईक रेट २१ होता आणि स्लेजिंग केल्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट १५० झाला. सेहवागने असेही लिहिले की, “पुजारासारखा खेळत होता, विराट कोहलीने विनाकारण स्लेजिंग करून पंत बनवून टाकले.”

विराट कोहली जरी त्याच्या आक्रामक स्वभावासाठी ओळखला जात असला आणि चाहत्यांना त्याचा हा स्वभाव आवडत असला, तरी बेयरस्टोसोबत त्याने स्लेजिंग केल्यामुळे संघाला त्याची किंमत मोजावी लागली. विराटने हा वाद घालण्यापूर्वी बेयरस्टोने ६१ चेंडूत अवघ्या १३ धावा केल्या होत्या. परंतु नंतर त्याने ११९ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. असे असले तरी, बेयरस्टो शेवटी विराटच्याच हातात झेलबाद झाला, जेव्हा मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. त्याने एकूण १४० चेंडू खेळले आणि १०६ धावा करून बाद झाला.

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात भारताने ३१६ धावा केल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळला गेला. भारतासाठी रिषभ पंत (१४६) आणि रवींद्र जडेजाने (१०४) शतक ठोकले, तर इंग्लंडसाठी बेयरस्टो शतक करणारा एकमात्र खेळाडू ठरला. जेम्स अँडरसनने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे मोहम्मद सिराजने ४ आणि जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

फन फिटनेस आणि पुणेरी वॉरियर्सचा महिला लीगमध्ये सहज विजय

विराटची स्लेजिंग टीम इंडियाला नडली? शाब्दिक चकमकीनंतर बेयरस्टोचे झंजावाती शतक

Video: बेयरस्टोला पवेलियनमध्ये धाडताच विराट झाला भलताच खूष, कॅमेरात कैद झाला क्षण

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---