---Advertisement---

तोंडचा घास पळाला! एवढे करून पण बटलर डिविलीयर्सचा तो विक्रम मोडू शकला नाही

---Advertisement---

इंग्लंडचा संघ नेदरलॅंड्सच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या वनडे सामन्यात धावांचा पाऊस पडला आहे. या सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ४ विकेट्स गमावत ४९८ धावा केल्या आहेत. हा सामना इंग्लंडने २३२ धावांनी जिंकला आहे. यावेळी इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर याने त्याचा आयपीएलचा (इंडियन प्रीमियर लीग) फॉर्म कायम राखत धडाकेबाद नाबाद दिडशतकी खेळी केली आहे. यावेळी त्याच्याकडून अनेक विक्रम झाले तर काही विक्रम तोडण्यात तो थोडक्यात मुकला आहे.

व्हीआरएच्या क्रिकेट ग्राऊंड, ऍमस्टेलवीन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बटलरने ७० चेंडूत २३१.४३च्या स्ट्राईट रेटने नाबाद १६२ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ७ चौकार आणि १४ षटकार ठोकले आहेत. या झंझावाती खेळीने दक्षिण आफ्रिकेचा महान यष्टीरक्षक-फलंदाज ए बी डिविलियर्सचा विक्रम थोडक्यात वाचला आहे.

या सामन्यात बटलरने ६५ चेंडूत दिडशतक झळकावले आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात जलद दिडशतकी खेळी करण्याचा विक्रम डिविलियर्सच्या नावावर आहे. त्याने ६४ चेंडूत १५० धावा केल्या होत्या.

नेदरलॅंड्स विरुद्धच्या सामन्यात बटलर बरोबर फिलीप साल्ट, डेविड मलान या इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतके केली आहेत. इंग्लंडच्या संघाने केलेली धावसंख्या वनडेच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. याआधी २०१८मध्ये ट्रेंटब्रिज, नॉटींघम येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४८१ धावा केल्या होत्या.

आयपीएल २०२२च्या स्पर्धेत बटलर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. त्याने १७ सामन्यात ८६३ धावा केल्या होत्या. या स्पर्धेच्या ऑरेंज कॅपचा मानकरी असलेल्या बटलरने या हंगामात चार शतके केली आहेत. आयपीएलच्या एकाच हंगामात चार शतके करण्याचा पराक्रम करणारा तो विराट कोहली नंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे.

वनडेच्या इतिहासात बटलरने दोनवेळा ७६ पेक्षा कमी चेंडूत दिडशतकांचा आकडा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी केली. लियाम लिविंगस्टोनसोबतही त्याने पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. यावेळी लिविंगस्टोनने २२ चेंडूत ६६ धावा केल्या.

या दौऱ्यात तीन वनडे सामने खेळले जाणार असून त्यातील दुसरा सामना रविवारी (१९ जून) खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आनंद गगनात मावेना! तब्बल २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला ‘हा’ संघ

अरे व्वा! केकेआरनंतर आता ‘या’ क्रिकेट संघाचा मालक बनला शाहरुख खान, पहिल्या सामन्यासाठी उत्सुक

भुवीच्या बाऊंसरनंतर आफ्रिकेचा कर्णधार गारद, रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---