इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं एका डावात 800 पेक्षा जास्त धावा ठोकल्या. 1997 नंतर प्रथमच कोणत्या संघानं कसोटीत 800 धावांचा टप्पा गाठला आहे.
कसोटी क्रिकेटचा इतिहास तसा खूप जुना आहे. मात्र आतापर्यंत फक्त 4 वेळा 800 पेक्षा जास्त धावसंख्या बनली. विशेष म्हणजे, यापैकी 3 वेळा इंग्लंडच्या संघानं हा कारनामा केला आहे. तर एक वेळा श्रीलंकेच्या संघानं 952 धावा करून विश्वविक्रम रचला. मुलतान कसोटीत इंग्लंडच्या संघानं आपला पहिला डाव 823 धावसंख्येवर घोषित केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं 149 षटकांत सर्वबाद 556 धावा केल्या होत्या. तर इंग्लडच्या संघानं 150 षटकं खेळून 800 धावांचा पल्ला गाठला. संघानं 7 गडी गमावून 823 धावा केल्यानंतर डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लडकडे सध्या 267 धावांची आघाडी आहे. सामन्यात आणखी 130 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर इंग्लंडनं पाकिस्तानला 267 धावांपूर्वी ऑलआऊट केलं, तर त्यांना डावानं विजय मिळेल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या
952/6 – श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, 1997
903/7 – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओवल, 1938
849/7 – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन, 1930
823/7 – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024
790/3 – वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान, किंग्स्टन, 1958
मुलतानच्या या पाटा खेळपट्टीवर खूप धावा निघाल्या आहेत. इंग्लंडसाठी या सामन्यात हॅरी ब्रुकनं त्रिशतक ठोकलं. तो 317 धावा करून बाद झाला. तर स्टार फलंदाज जो रुटनं 250 धावांचा आकडा गाठला. तो 262 धावा करून बाद झाला. पाकिस्तानसाठी या सामन्यात तिघांनी शतकं ठोकली. अब्दुल्लाह शफीकनं 102, शान मसूदनं 151 आणि आगा सलमाननं 104 धावा केल्या.
हेही वाचा –
एक-दोन नव्हे तर इतक्या रेकॉर्ड्स, बांग्लादेशला हरवून भारताने केले मोठे विक्रम
रतन टाटा यांचं क्रिकेटशी होतं खास नातं, अनेक दिग्गजांच्या जडणघडणीत टाटांचा मोठा वाटा!
एकाच डावात दोन द्विशतके, 400+ भागीदारी; जो रूट-हॅरी ब्रूक यांच्याडून अनेक रेकाॅर्ड मोडीत