सध्या इंग्लंड संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना द ओवल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 36 धावांची आघाडी घेतली असून दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ब्रॉड आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
लंडनमधील केनिंग्टन शहरात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम खेलपट्टीवर उतरलेला आफ्रिकी संघ पहिल्या डावात अवघ्या 118 धावा करू शकला. या धावा करण्यासाठी त्यांच्या फलंदाजांना 36.2 षटके खेळून काढली. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने 4 विकेट्स घेतल्या. ब्रॉडने 12.2 षटकात 41 धावा खर्च करून ही कांगिरी केली. या चार विकेट्स रयान रिकेलटन, खाया जोंडो, केशव महाराज आणि एनरिक नॉर्खिया यांच्या होत्या.
रॉर्खिया सर्वात शेवटी 11 व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होत. ब्रॉडने त्याची विकेट घेतली आणि ऑस्ट्रेलियान दिग्गज ग्लेन मॅकग्रा (Glenn Mcgrath) यांची बरोबरी केल आहे. मॅकग्रा यांच्या नावर एकूम 563 कसोटी विकेट्सची नोंद आहे. मॅकग्रांनी ही कामगिरी कारकिर्दीतील 124 कसोटी सामन्यांमध्ये केली होती. आता ब्रॉडला मात्र एवढ्याच कसोटी विकेट्स घेण्यासाठी 159 कसोटी सामने खेळवे लागले आहेत. ब्रॉड आता कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पाचवा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. इंग्लंडसाठी तो जेम्स अँडरसन () नंतर दुसरा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. अँडरसन जागतिक क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट्से (665 विकेट्स) घेणारा गोलंदाज आहे. यादीर पहिल्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन (800), तर दुसऱ्या क्रमांकावर शेन वॉर्न (708) आहे.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर दक्षिण आफ्रिकनेच्या 118 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपंल्यावर इंग्लंडची धावसंख्या 7 विकेट्सच्या नुकसानावर 154 झाली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकाच्या फायनलपूर्वी हर्षा भोगलेनी निवडली स्पर्धेतील बेस्ट प्लेइंग 11! वाचा कोणाला मिळाली संधी
‘आम्ही हा सामना जबरदस्तीने खेळलो!’ पहिल्या टी20त पराभवानंतर हरमनप्रीत कौरने केला खुलासा
शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी उतरलेल्या फिंचने केले निराश! केवळ ‘इतक्या’ धावा करत झाला बाद