इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मॅनचेस्टर येथे खेळला जात आहे. 21 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या सामन्यात श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या प्रियनाथ रथनायके यानं तब्बल 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. श्रीलंकेच्या या फलंदाजानं माजी भारतीय खेळाडू बलविंदर सिंग संधू यांचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे.
प्रियनाथ रथनायके यानं नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 135 चेंडूत 72 धावांची खेळी खेळली. यासह त्यानं क्रिकेटमधील 42 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. 72 धावांसह रथनायके नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या बलविंदर संधू यांच्या नावे होता.
संधू यांनी 1983 मध्ये पाकिस्तान विरुद्ध हैदराबाद येथील कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 71 धावा ठोकल्या होत्या. आता रथनायके यानं 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 72 धावा ठोकून हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. रथनायके इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरच्या गोलंदाजीत बाद झाला.
21 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेचे फलंदाज कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवू शकले नाहीत. पाहुणा संघ पहिल्याच दिवशी 236 धावांवर ऑलआऊट झाला. श्रीलंकेसाठी कर्णधार धनंजय डी सिल्वानं 8 चौकारांच्या मदतीनं सर्वाधिक 74 धावा केल्या. तर प्रियनाथ रथनायकेनं 72 धावा ठोकल्या. या दोघांव्यतिरिक्त सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.
इंग्लडसाठी ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. याशिवाय गस ॲटकिंसन याला 2 आणि मार्क वुडला 1 बळी मिळाला.
हेही वाचा –
“मी थांबणार नाही…”, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC चे जेतेपद पटकवाण्यासाठी रोहितने भुंकला रणशिंग!
रोहित शर्मासाठी सप्टेंबर महिना ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार महान विक्रम
देशाचं दुर्दैव! ऑलिम्पिकमधील स्टार खेळाडूचा खेळाला अचानक रामराम, काय आहे कारण?