मुंबई । इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा खतरनाक गोलंदाज आहे. ऍशेस मालिकेदरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथला एक खतरनाक चेंडू टाकून जखमी केले होते. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
नुकतेच वेस्टइंडीजविरुद्ध साऊथँम्पटनला सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात विंडीज फलंदाज जॉन कॅम्पबेलला जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर दुखापत झाली आहे.
या सामन्याच्या पाचव्या दिवशी (12 जुलै) इंग्लंडचा संघ 313 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीज संघावर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने धारदार गोलंदाजी करत वर्चस्व गाजवले होते. त्याने सुरुवातीचे दोन गडीही बाद केले.
यावेळी वेस्ट इंडीजच्या चौथ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर आर्चरने एक भेदक चेंडू टाकला. त्यावर कॅम्पबेल लंगडताना दिसून आला. आर्चरने त्यापूर्वी एक यॉर्कर चेंडू टाकला होता जो कॅम्पबेलच्या पायाच्या अंगठयाला लागला होता. त्यामुळे त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
या दुखापतीमुळे त्याला सामन्यातूनही रिटायर्ट हर्ट होऊन बाहेर जावे लागले होते. तो डॉक्टर आणि एका खेळाडूच्या खांद्याचा आधार घेत लंगडत ड्रेसिंग रूमकडे परतला होता. त्याने या डावात 11 चेंडूत 1 धाव केली होती. तसेच त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात 28 धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
आता भर पावसात सुरु राहणार क्रिकेटचा सामना, भारतात सुरु आहे सर्वात हायटेक स्टेडियमचे काम
सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार ‘या’ संघाकडून
ब्रॉडला संघात संधी न मिळण्याबद्दल अँडरसन म्हणाला, इंग्लंडसाठी चांगली गोष्ट झाली की…