---Advertisement---

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन; ‘या’ दिग्गजाचे इंग्लंड संघात पुनरागमन

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 5:18 PM
ashes
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashesh series) थरार सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला आहे. यासह मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. इंग्लंड संघ अजूनही आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ जोरदार कामगिरी करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे.(playing 11 of England and Australia)

मेलबर्नच्या मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्कॉट बोलँडने (Scott Boland) ऑस्ट्रेलिया संघाकडून पदार्पण केले होते. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना अवघ्या ६ धावा खर्च करत ७ गडी बाद केले होते. ज्यामुळे इंग्लंड संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. याच कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने सामना आपल्या नावावर केला होता.

तसेच ऑस्ट्रेलिया संघातील अनुभवी गोलंदाज जोश हेजलवूडला दुखापतीमुळे सलग तिसऱ्या सामन्यातही बाहेर बसावे लागणार आहे. ज्यामुळे स्कॉटला या संघात स्थान मिळणे निश्चित आहे. या संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. मध्यक्रमातील फलंदाज ट्रेविस हेडला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये. त्याच्या ऐवजी उस्मान ख्वाजाला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि फिरकीपटू नॅथन लायनवर असणार आहे. या गोलंदाजांना साथ देण्यासाठी कॅमरून ग्रीनचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड संघाकडून मुख्य गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना संघात स्थान दिले आहे. स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत मालिकेतील एकच कसोटी सामना खेळला आहे. तो पुनरागमन करत असल्याने ऑली रॉबिन्सनला संघाबाहेर जावे लागले.

इंग्लंड संघातील फलंदाजी क्रमाबाबत बोलायचं झालं तर, कर्णधार जो रूटला सोडलं तर इतर कुठलाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता येत नाहीये. ज्यामुळे इंग्लंड संघाच्या फलंदाजी क्रमात कुठलाही बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.

चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, उस्मान खाजा, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरोन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड व नॅथन लायन

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ-
हसीब हमीद, झॅक क्राऊली, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो,‌ जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड, जॅक लिच व जेम्स अँडरसन.

महत्वाच्या बातम्या :

SAvsIND, 2nd Test, Live: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, दक्षिण आफ्रकेचे २७ षटकांत ५० धावा पार

कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात केएल राहुलचा मोठा विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटर

हे नक्की पाहा :

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---