जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-2023 समाप्त झाल्यानंतर आता या स्पर्धेच्या नव्या सायकलला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेने ही सायकल सुरू होईल. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी यजमान इंग्लंडने आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सामन्याला दोन दिवस शिल्लक असतानाच इंग्लंड संघ व्यवस्थापनाकडून ही घोषणा करण्यात आली.
उभय संघादरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 16 जूनपासून ऍजबस्टन येथे खेळला जाईल. मागील ऍशेस गमावलेल्या इंग्लंडला यावेळी आपल्या घरच्या मैदानावर विजय संपादन करण्याची मोठी संधी असेल. त्याचाच भाग म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी कसोटीतून निवृत्त झालेल्या मोईन अली त्याला पुन्हा एकदा संघात पाचारण केले आहे. प्रमुख फिरकीपटू जॅक लिच जखमी झाल्याने जखमी झाल्याने त्याला बोलावण्यात आले.
सामना सुरू होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असतानाच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर करून ऑस्ट्रेलियाला एक प्रकारे संदेश दिला आहे. या संघात सलामीची भूमिका बेन डकेट व झॅक क्राऊली हे निभावतील. त्यानंतर मधल्या फळीत अनुभवी जो रूट, युवा ओली पोप व हॅरी ब्रुक दिसतील. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स, पुनरागमन करत असलेले जॉनी बेअरस्टो व मोईन अली संघाची फलंदाजी मजबूत करतील. तर वेगवान गोलंदाजीचा भार कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये असलेले जेम्स अँडरसन, ओली रॉबीन्सन व स्टुअर्ट ब्रॉड हे वाहतील.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ- बेन बकेट, झॅक क्राऊली, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ओली रॉबीन्सन, स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन.
(England Announced Playing XI For First Ashes Test Against Australia Bairstow And Ali Comeback)
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?