इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम संपला आहे. पण सध्या क्रिकेटप्रेमी तमिळनाडू प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. टीएनपीएल 2023चा दुसरा सामना मंगळवारी (13 जून) सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात खेळला गेला. लीगच्या दुसऱ्याच सामन्यात एक असा विक्रम बनला, जो बहुदा भारतात पहिल्यांदाच झाला असेल. अभिषेक तंवर या वेगवान गोलंदाजाने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा चेंडू फेकल्याचे बोलले जात आहे.
सालेम स्पार्टन्सचा वेगवान गोलंदाज अभिषेन तंवर (Abhishek Tanwar) याने चेपॉक सुपर गिलीजच्या डावातील शेवटचा चेंडू टाकला, जो त्याच्या संघाला चांगलाच महागात पडला. आपण यापूर्वी महागडे षटक ऐकले आहे, पण महागाडचा चेंडू फारच कमी वेळा ऐकायला मिळते. कारण एका चेंडूवर फलंदाज फार फार तर 6 धावा घेऊ शकतो. पण टीएनपीएल 2023मध्ये अभिषेने एका चेंडूवर तब्बल 18 धावा खर्च केल्या. आपल्या षटकातील पहिल्या पाच चेंडूवर त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. पण शेवटचा चेंडू सालेम स्पार्टन्स संघाला चांगलाच महागात पडला. स्वतः कर्णधाराने असा चेंडू टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अभिषेने डावातील शेवटच्या चेंडूवर सुपर गिलीजचा फलंदाज संजय यादव याला त्रिफळाचीत केले होते. अभिषेक विकेट मिळाल्याच्या आनंदात होता. मात्र, तितक्यात पंचांनी हा चेंडू नो बॉल असल्याचे घोषित केले. अभिषेकचा पाय क्रीजच्या खूप पुढे होता. पुढच्या चेंडूवर फलंदाजाल फ्री हिड मिळाल्यामुळे फलंदाजाने बॅट जोरात फिरवली आणि षटकार मारला. विशेष म्हणजे अभिषेकने यावेळीही नो बॉल टाकला होता. अभिषने त्यानंतर टाकेलला चेंडूही नो बॉल फेकला, ज्यावर फलंदाजाने दोन धावा घेतल्या. सलग तीन चेंडू नो बॉल टाकल्यानंतर अभिषने पुढचा चेंडू वाईड टाकला. अभिषेकने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर सुपर गिलीजचा फलंदाज संजय याने मिडविकेटच्या दिशेने पुन्हा षटकार मारला. अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर अभिषेने एकूण 18 धावा खर्च केल्या. (Salem Spartans vs Chepauk Super Gillies)
The most expensive delivery ever? 1 Ball 18 runs#TNPLonFanCode pic.twitter.com/U95WNslHav
— FanCode (@FanCode) June 13, 2023
शेवटच्या षटकात अभिषेकने एकूण 26 धावा खर्च केल्या असून संघाला सालेम स्पार्टन्सला याची किंमत पराभवाने मोजावी लागली. स्पार्टन्सला विजयासाठी 218 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्या संघ गाठू शकला नाही. निर्धारित 20 षटकात स्पार्टन्स संघाने 165 धावांपर्यंत मजल मारली. असे असले तरी सर्वात महागड्या चेंडूचा विक्रम अभिषेकच्या नावावर झाला नाही. हा विक्रम आजही बिग बॅश लीगमध्ये एका चेंडूत 20 धावा खर्च करणाऱ्या क्लिंट मेकॉय याच्याच नावावर आहे. बीबीएल 2012-13मध्ये मेकॉयने होबार्ट हरिकेन्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हा नकोसा विक्रम केला होता. (Indian bowler spent 18 runs in one ball in TNPL)
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडला मोठा झटका! केन विलियम्सननंतर ‘हा’ अष्टपैलू वनडे विश्वचषकातून बाहेर, ‘हे’ आहे कारण
सर्व माहितीः असे पाहा एमपीएलचे सामने लाईव्ह, तिकीटांपासून ते टाईमटेबल सर्वकाही एका क्लिकवर