आगामी टी२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार असून अंतिम सामना १४ नोव्हेंबरला पार पडेल. तत्पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघ टी२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी ओमानमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंड संघ मंगळवारी (५ ऑक्टोबर) सकाळी लवकर ओमानमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या संचार प्रमुखांनी त्यांच्या ट्वीटरवरून खेळाडूंचा विमानातून उतरतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि संघ ओमनमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
सध्या आयपीएल २०२१ चे अंतिम टप्प्यातील काही सामने खेळायचे बाकी असून इंग्लंडचेही काही खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झालेले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर स्पर्धेत सामील झालेले इंग्लंडचे खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघासोबत जोडले जातील. इंग्लंड २३ ऑक्टोबरपासून वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्याने त्यांच्या टी२० विश्वचषकातील अभियानाला सुरुवात करेल. इंग्लंड आणि वेस्टइंडीज संघांत हा सामना दुबई आंतरराष्ट्र्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल.
Members of the @englandcricket men’s T20 squad have arrived in Muscat. Prep begins for the @T20WorldCup 🏏 pic.twitter.com/B8aCGjJuvo
— Danny Reuben (@dannyreuben) October 5, 2021
टी२० विश्वचषकात या दोन खेळाडूंची भासेल कमतरता
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला टी२० विश्वचषकामध्ये संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंची कमतरता भासेल. इंग्लंडचे प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दोघेही विश्वचषकामध्ये इंग्लंड संघासोबत सहभागी झालेले नाहीत. बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. तसेच जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे पूर्ण वर्ष विश्रांतीवर आहे.
इंग्लंड संघाला क्रिस वोक्सकडून विश्वचषकात दमदार प्रदर्शनाच्या अपेक्षा आहेत. बेन स्टोक्सची कमतरता भरून काढण्यासाठी क्रिसला यावर्षी टी२० संघात सामील केले गेले आहे. तसेच जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंड संघात टायमल मील्सला संधी देण्यात आली आहे. त्याने टी२० ब्लास्ट आणि द हंड्रेडमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते आणि या पार्श्वभूमीवर त्याला विश्वचषकासाठी संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विनम्र ईशान! विराटसह ‘या’ दिग्गजांना दिले तुफानी खेळीचे श्रेय
युएईत ईशानचा बोलबाला! रोहित-सूर्याला मागे टाकत केला नवा पराक्रम