भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या पुनर्निधारीत पाचव्या कसोटी सामन्यात धुव्वादार शतक केले आहे. या शतकी खेळीसह त्याने विक्रमांची रास घातली आहे. त्याच्या दणकेबाज खेळीचे क्रिकेटजगतातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, अगदी इंग्लंड संघाचे साहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड हेदेखील स्वतला पंतची प्रशंसा करण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांनी पंतवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
कॉलिंगवुड (Paul Collingwood)म्हणाले की, “मी त्याच्या खेळीला पाहून त्याला सलाम ठोकू इच्छितो आहे. तो ज्याप्रकारे खेळला, ते कौतुकास्पद होते. जेव्हा तुम्ही विश्वस्तरीय खेळाडूंविरुद्ध दमदार खेळता, तेव्हा तुम्ही विश्वस्तरीय गोष्टी करू शकता. आज त्याचा दिवस होता. पंतची खेळी ही या गोष्टीचे प्रमाण आहे की, कसोटी क्रिकेट वेगाने बदलत आहे.”
पुढे बोलताना कॉलिंगवुड (Paul Collingwood Praises Rishabh Pant) म्हणाले की, “मात्र पंत आणि रविंद्र जडेजामध्ये नाबाद २२२ धावांची भागीदारी झाली, जे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी निराशाजनक होते. याचा अर्थ असा नाहीये की, इंग्लंडचा संघ आता तोट्यात आहे.”
“मला नाही वाटत की, सामन्यात आम्ही जास्त वेळ मागे होतो. आमचे फलंदाज या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी उत्साहित आहेत. जर आम्ही भारतीय संघाला ३६०-३७० धावांवर थांबवू शकलो तर हे आमच्यासाठी फायद्याचे ठरेल. आम्ही न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहिले आहे, जेव्हा ३०-४० षटके होतात, त्यानंतर विकेट घेणे कठीण होते. कारण थोड्या वेळानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होते,” असेही कॉलिंगवुड म्हणाले.
दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) संघाचा मोर्चा सांभाळला. रविंद्र जडेजाला साथीला घेत त्याने मोठ्या धावा जोडल्या. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान पंतने त्याचे शतक (Rishabh Pant Century) पूर्ण केले. १११ चेंडू खेळताना ४ षटकार आणि २० चौकारांच्या साहाय्याने त्याने १४६ धावांची खेळी केली. हे पंतचे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये केलेले तिसरे शतक आहे. तर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता ‘पंड्या पॉवर’ काऊंटी क्रिकेटमध्येही गाजणार! ‘हे’ दोन भारतीयही होणार सहभागी
शरद पवारांना धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त; वाचा कारण
दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारताचा सोपा विजय, डर्बीशायरला ७ विकेट्सने केले पराभूत