तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध संघर्ष सुरूच आहे. पहिल्या डावात ३५४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा ९१ आणि कर्णधार विराट कोहली ४५ धावा काढून नाबाद आहेत. मात्र, भारतीय संघाला या सामन्यात विजयाची अजूनही संधी आहे. भारतीय संघाने २०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य इंग्लंड पुढे ठेवल्यास भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवू शकतो.
चौथ्या डावात इंग्लंडची खराब कामगिरी
हेडिंग्ले मैदानावरील इंग्लंडची चौथ्या डावातील कामगिरी पाहता विक्रम पाहता इंग्लंड संघाने १२वेळा या मैदानावर चौथ्या डावात डावात २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र, त्यापैकी ७ सामन्यात त्यांना पराभव पहावा लागला आहे. तर तीन सामने त्यांना जिंकण्यात यश आले.अशा परिस्थितीत भारतीय संघाला सामन्यात जिवंत राहायचे असल्यास किमान २०० धावांचे आव्हान इंग्लंडला द्यावे लागेल. सामन्यात टिकण्यासाठी किमान 200 धावांची आघाडी आवश्यक आहे. २०१९ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना याच मैदानावर ९ बाद ३६२ धावा करून जिंकला होता. या सामन्यात शानदार शतक झळकावणारा बेन स्टोक्स सध्याच्या मालिकेतून बाहेर आहे.
भारताची आकडेवारीही चांगली
हेडिंग्लेमध्ये भारतीय संघाने इंग्लंड संघाला चौथ्या डावात १५० पेक्षा कमी धावांवर बाद करण्याची कामगिरी केली आहे. १९८६ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत भारताने २७२ आणि २३७ धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या डावात १०२ धावा केलेल्या. अशा प्रकारे त्यांना ४०८ चे लक्ष्य मिळाले होते. मात्र, केवळ १२८ धावा केल्यावर इंग्लंडचा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या डावात डावखुरे फिरकी गोलंदाज मनिंदर सिंग यांनी २६ धावा देऊन ४ बळी घेतलेले. याशिवाय रवी शास्त्री यांनाही एक बळी मिळाला. सध्याच्या टीम इंडियाकडे डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आहे. त्याने पहिल्या डावात २ बळीही घेतले. तो दुसऱ्या डावात भारतासाठी महत्त्वपूर्ण शस्त्र म्हणून सिद्ध होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी
‘या’ कारणामुळे मायकल वॉनचा कोहलीला प्रश्न; म्हणाला, ‘याची उत्तरे तुला द्यावीच लागतील’
क्रिकेटच्या काळ्या अध्यायाला १२ वर्षे: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण