मंगळवारी (10 ऑक्टोबर) वनडे विश्वचषकात इंग्लंड व बांगलादेश संघ आमने-सामने आले. आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागलेल्या इंग्लंडने या सामन्यात शानदार पुनरागमन केले. त्यांनी विजयी सुरुवात केलेल्या बांगलादेशला अगदी एकतर्फी झालेल्या सामन्यात 137 धावांनी पराभूत करत विजय नोंदवला. इंग्लंड संघासाठी सलामीवीर डेव्हिड मलान याने झळकावलेले शतक व वेगवान गोलंदाज रिसे टोप्ली याने मिळवलेले चार बळी महत्त्वाचे ठरले.
ENGLAND BEAT BANGLADESH BY 137 RUNS….!!!
First win for Defending champions in World cup, heroes are Malan, Root, Bairstow & Topley. pic.twitter.com/k2euYkGFdX
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या इंग्लंडला डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी 17.5 षटकात 115 धावांची सलामी दिली. बेअरस्टो अर्धशतक करून बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जो रूट याने देखील जोरदार फटकेबाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांना दबावात टाकले. डेव्हिड मलान याने या सामन्यात 107 चेंडूंचा सामना करताना 140 धावांची शतकी खेळी केली. दुसऱ्या बाजूने रूट याने 68 चेंडूंचा सामना करताना 82 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी साकारली. बांगलादेश संघासाठी शोरीफुल इस्लाम याने सर्वाधिक चार तर मेहदी हसनने तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. रिसे टोप्ली याने पहिल्या पाच षटकातच त्यांचे तीन बळी टिपले. त्यानंतर मेहंदी हसनही फार काळ संघर्ष करू शकला नाही. त्यानंतर लिटन दास व मुशफिकूर रहीम यांनी 70 धावांची भागीदारी केली. दासने 76 तर रहिमने 51 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त तोहीद ह्रिदॉयने 39 धावांचे योगदान दिले. खालच्या फळीतील फलंदाज तितकीशी चांगली कामगिरी करू न शकल्याने बांगलादेशचा संघ 227 धावांवर सर्वबाद झाला.
(England Beat Bangaladesh By 137 Runs In ODI World Cup Malan Topley Shines)
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
‘सॉलिड’ समरविक्रमाने झोडली पाकिस्तानची गोलंदाजी, फक्त इतक्या चेंडूवर ठोकले शतक