इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 323 धावांनी धुव्वा उडवला आहे. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर विजयासाठी 583 धावांचे मोठे लक्ष्य होते, मात्र न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 259 धावांवर ढेपाळला. या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.
इंग्लंडच्या या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या पराभवासह न्यूझीलंड संघ सहाव्या स्थानी पोहोचला आहे, तर इंग्लंड संघाने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. या पराभवासह न्यूझीलंड संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
सध्या गुणतालिकेत भारतीय संघ शीर्ष स्थानी आहे. भारताची विजयाची टक्केवारी 61.11 आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ (59.26 विजय टक्केवारी) दुसऱ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ (57.69 विजय टक्केवारी) तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका संघ (50.00 विजयाची टक्केवारी) चौथ्या स्थानावर आहे.
इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 280 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने (Harry Brook) (123) शतक झळकावले. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मात्र, पहिल्या डावात 280 धावांवर रोखलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 125 धावांत गुंडाळला. गस ऍटकिन्सन आणि ब्रेडन कार्सने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात जो रुटचे शतक (106), बेन डकेट (92), जेकब बॅचेलर (96), हॅरी ब्रूक (55) आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने 6 गडी बाद 427 धावा केल्या आणि घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 583 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
583 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेला न्यूझीलंड संघ खेळाच्या तिसऱ्या दिवशी 259 धावांवर ढेपाळला. टॉम ब्लंडेल (115 धावा) वगळता इतर कोणताही फलंदाज टिकून राहू शकला नाही. इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने (Ben Stokes) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला (Harry Brook) या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या ‘या’ 3 हंगामात चमकली संजू सॅमसनची बॅट, पाडला धावांचा पाऊस!
बीसीसीआय सचिवपदी देवजीत सैकिया यांची निवड! जय शाहांची जागा घेणार
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल गोलंदाजी प्रशिक्षकाने दिले मोठे अपडेट