इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (1 ऑक्टोबर) खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने न्यूझीलंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. जॉनी बेअरस्टो व हॅरी ब्रुक यांनी ठोकलेल्या तुफानी अर्धशतकानंतर युवा गस ऍटकिन्सन याने घेतलेल्या चार बळींमुळे इंग्लंडने 95 धावांनी शानदार विजय साजरा केला. यासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंड संघाला विल जॅक्स व बेअरस्टो यांनी चाळीस धावांची सलामी दिली. मात्र जॅक्स व मलान पाठोपाठ बाद झाले. त्यानंतर मैदानावर आलेल्या ब्रुकने बेअरस्टोला साथीला घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. ब्रुकने 36 चेंडूंवर पाच षटकार व पाच चौकारांच्या मदतीने 67 धावा कुटल्या. तर, अखेरपर्यंत नाबाद राहिलेल्या बेअरस्टोने 8 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. त्यांच्या योगदानामुळे इंग्लंडने 198 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्यापासून सूर गवसला नाही. टीम सायफर्ट 39 व ग्लेन फिलिप्स 22 वगळता इतर कोणताही फलंदाज 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. इंग्लंडसाठी युवा गस ऍटकिन्सन याने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर आदिल रशीद याने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
या विजयासह इंग्लंडने मालिका खिशात घातली असून, तिसरा सामना अनौपचारिक ठरेल. त्यानंतर या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
(England Beat Newzealand In 2nd T20I By 95 Runs Brook Bairstow Shines)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य






