---Advertisement---

टी२० विश्वचषक: श्रीलंकेवर २६ धावांनी विजयासह इंग्लंडने सेमीफायनलचे तिकीट केले पक्के

On: मंगळवार, नोव्हेंबर 2, 2021 1:35 AM
---Advertisement---

टी-२० विश्वचषकात सोमवारी(१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये आमना-सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद १६३ धावा केल्या आणि श्रीलंकेपुढे विजयासाठी १६४ धावाचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघ सामन्याचा शेवटच्या षटकापर्यंत खेळू शकला नाही. श्रीलंकेचा संघ १९ व्या षटकात १३७ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी इंग्लंडने सामन्यात विजय मिळवला.

या विजयासह इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचणारा इंग्लंड पहिलाच संघ आहे.

सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय काही खास करू शकला नाही, पण दुसरा सलामीवीर जॉस बटलरने (१०१) संघाला चांगली सुरुवात दिली आणि त्याचे विश्वचषकातील पहिले शतक पूर्ण केले. बटलर टी-२० विश्वचषकात शतक करणारा आठवा खेळाडू ठरला आहे. त्याने नाबाद १०१ धावांची खेळी ६७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह केली.

त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या डेविड मलान(६) आणि जॉनी बेअरस्टोने (०) चाहत्यांची निराशा केली. पण, पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या कर्णधार ओएन मॉर्गनने ३६ चेंडूत ४० धावांची महत्वाची खेळी केली. तसेच, त्याने बटलरसह ११२ धावांची भागीदारीही केली. मॉर्गननंतर मोईन अली मैदानात आला आणि त्याने दोन चेंडूंमध्ये एक धाव केली. जॉस बटलर आणि मोईन अली यांनी नाबाद खेळी केली.

श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने २१ धावा देऊन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याव्यातिरिक्त श्रीलंकेसाठी चमीराने तब्बल ४३ धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. या दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेचा कोणताही गोलंदाज विकेट घऊ शकला नाही.

त्यानंतर श्रीलंकेकडून १६४ धावांचा पाठलाग करताना त्यांचे सलामीवीर पाथूम निसंका (१) आणि कुशल परेरा (७) यांना मोठी खेळी करता आली नाही. तिसऱ्या क्रमांकावार फलंदाजीला आलेल्या चरिथ असलंकाने १६ चेंडूत २१ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर आलेला भानुका राजपक्षेने १८ चेंडूत २६ धावा आणि सहाव्या क्रमांकावरील कर्णधार दसून शनाकाने २५ चेंडूत २६ धावा केल्या.

अखेर वनिंदू हसरंगाने २१ चेंडूत सर्वाधिक ३४ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याचा १७ व्या षटकात जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्सने मिळून सीमारेषेजवळ अद्भूत झेल घेतला. यानंतर श्रीलंकेची तळातली फळी झटपट कोलमडली. त्यामुळे १९ षटकांतच संघावर सर्वबाद होण्याची वेळ आली.

इंग्लंडसाठी मोईन अली, आदील राशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेला सर्वबाद करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. ख्रिस वॉक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

इंग्लंडचा हा विश्वचषकातील सलग चौथा विजय असून इंग्लंड संघ ग्रुप एकमध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेसाठी हा चार सामन्यांपैकी तिसरा पराभव आहे. श्रीलंका गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे आणि उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून श्रीलंका जवळपास बाहेर गेला आहे. सामन्यात शतक करणाऱ्या जॉस बटलरला शेवटी सामनावीर म्हणून निवडले गेले.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: …आणि इथेच सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले, सीमारेषेजवळील तो अद्भुत कॅच

मॉर्गनचा विश्वविक्रम! ‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत ठरला आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात यशस्वी कर्णधार

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचे १० वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---