शनिवारी (२६ जून) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाने श्रीलंका संघाला ८९ धावांनी पराभूत करत मोठा विजय मिळवला आहे. यासह त्यांनी टी-२० मालिकेत ३-० ने विजयी पताका झळकावली आहे.
या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघातील सलामी फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. इंग्लंड संघाकडून डेविड मालनने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार लगावले होते. तर जॉनी बेअरस्टोने ४३ चेंडूंमध्ये ५१ धावा चोपल्या होत्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला.
तर श्रीलंकन संघाकडून गोलंदाजी करताना दुष्मंता चामिराने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडले. २० षटकअखेर इंग्लंड संघाला ६ गडी बाद १८० धावा करण्यात यश आले होते. (England beat srilanka by 89 runs, won series by 3-0)
या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघातील फलंदाजांना साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. संघातील सलामी फलंदाज लवकर माघारी परतले होते. बिनुरा फर्नांडोची २० धावांची खेळी आणि ओशादा फर्नांडोची १९ धावांची खेळी वगळता इतर कुठल्याही फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात यश आले नव्हते. तर इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना डेविड विलीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर सॅम करनला २ गडी बाद करण्यात यश आले होते. श्रीलंकन संघाचा डाव १८.५ षटकात ९१ धावांवर संपुष्टात आला होता.
या मालिकेत इंग्लंड संघाने श्रीलंकाला ३-० ने व्हाईटवॉश दिला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंकन संघाला भारतीय संघाविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्वाच्या बातम्या-
ज्या फोटोमुळे धोनी झाला ट्रोल, त्या फोटोमागील खरं कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘वाह माही’
उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला मिळाला नवा मालक
मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी! सचिननंतर ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली क्रिकेटपटू