---Advertisement---

इंग्लंड वि श्रीलंका: पहिल्या वनडेत श्रीलंकेची नामुष्कीजनक हार, ख्रिस वोक्सची भेदक गोलंदाजी

On: बुधवार, जून 30, 2021 7:47 AM
---Advertisement---

इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेची विजयासह सुरू केली. संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ५ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ केवळ १८५ धावा करू शकला होता. जो रूटने नाबाद अर्धशतक झळकावून इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अशाप्रकारे यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी इंग्लंडने टी२० मालिका ३-० ने जिंकली होती. वनडे मालिकेतील दुसरा सामना १ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

इंग्लंडने केला धावांचा यशस्वी पाठलाग
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने वेगवान सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो (४३) आणि लियाम लिव्हिंग्स्टन (९) यांनी ४.५ षटकांत पहिल्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. बेअरस्टोने २१ चेंडूंचा सामना केला. ज्यात ६ चौकार आणि १ षटकार लगावला. मात्र, त्यानंतर संघ अडखळला आणि धावसंख्या ४ बाद ८० अशी झाली. कर्णधार ओएन मॉर्गन ६ आणि सॅम बिलिंग्ज केवळ ३ धावा करू शकले.

जो रूट (नाबाद ७९) आणि मोईन अली (२८) यांनी पाचव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करुन विजय निश्चित केला. सॅम करन ९ धावांवर नाबाद राहिला. जो रूटचा हा १५० वा वनडे सामना होता. श्रीलंकेकडून चमिराने तीन गडी बाद केले. इंग्लंडने लक्ष्य ३४.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे. यापूर्वी संघाने नुकतेच झालेले तीन टी२० आणि दोन कसोटी सामनेही जिंकले होते. चार बळी घेणारा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स सामनावीर ठरला.

श्रीलंकेची घसरगुंडी
तत्पूर्वी, श्रीलंकेचा संघ या पहिल्या वनडेमध्ये केवळ १८५ धावा करू शकला. संघाचा डाव ४२.३ षटकांत संपुष्टात आला. कर्णधार कुसल परेराने सर्वाधिक ७३ धावा केल्या. या डावादरम्यान त्याने वनडेमध्ये तीन हजार धावाही पूर्ण झाल्या. वनिंदू हसरंगेनेही ५४ धावांचे योगदान दिले. श्रीलंका संघातील ८ खेळाडू दुहेरी आकड्यांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. ख्रिस वोक्सने १८ धावा देऊन चार बळी घेतले. याशिवाय डेव्हिड विलीनेही तीन गडी बाद केले.

जो रूटचा कारनामा
जो रूटनेही अर्धशतकी खेळीसह वनडेमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या. वेस्ट इंडीजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासह तो सर्वात कमी डावांमध्ये येथे पोहोचण्याच्या बाबतीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर पोहोचला. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी १४१ डावात हा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाने सर्वात कमी १२१ डावांमध्ये हा विक्रम केला होता. विराट कोहली १३६ आणि केन विलियम्सन १३९ डावात या कामगिरी पर्यंत पोहोचले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे धोनीला मिळाला नाही निरोपाचा सामना, माजी निवडकर्त्यांनी केला खुलासा

भारताच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्रींची होणार उचलबांगडी? ‘या’ गोष्टी ठरणार कारणीभूत

‘ती’ गदा अपेक्षेपक्षा जास्त जड होती, किवी कर्णधार केन विलियम्सनची मजेशीर प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---