---Advertisement---

मुलतानच्या मैदानात उतरताच इंग्लंडने रचला इतिहास, वाचा सविस्तर

On: शुक्रवार, डिसेंबर 9, 2022 3:15 PM
England Team
---Advertisement---

सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला. दुसरा सामना मुलतान येथे खेळवला जात असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ शुक्रवारी (दि. 9 डिसेंबर) मैदनात उतरला आणि मैदानात उतरताच इतिहास रचला. विश्व क्रिकेटमध्ये 2000 सामने खेळणारा इंग्लंड पहिला संघ बनला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मुलतान कसोटी सामन्यात आक्रमक फलंदाजी करण्याचा परिणाम इंग्लंड संघाला सहन करावा लागला आहे.

मुलतानमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उतरताच इंग्लंड संघाने इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने आतापर्यंत 1057 कसोटी सामने, 773 एकदिवसीय सामने आणि 170 टी20 सामने खेळले आहेत. इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 1995 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने 1775 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पाकिस्तान 1608 सामने खेळत या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे संघ
इंग्लंड– 2000
ऑस्ट्रेलिया– 1995
भारत – 1775
पाकिस्तान- 1608
वेस्ट इंडिज – 1595

इंग्लंड आणि पाकिस्तान संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या विकेटसाठी झॅक क्राऊली (Zack Crowley) आणि बेन डकेट (Ben Duckett) यांनी 38 धावांची भागीदारी केली. इंग्लंड संघाला पहला झटका क्राऊलीच्या रुपात लागला. क्राऊली 19च्या वैयक्तिक धावसंख्येवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर बेन डकेट आणि ओली पोप (Ollie Pope) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी झाली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर बाकीचे फलंदाज देखील झटपट बाद झाले. या सामन्यात पाकिस्तान संघासाठी पदार्पण करणाऱ्या अबरार एहमद (Abrar  Ahmed) याने 7 विकेट घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज स्वप्नातही आठवेल! पदार्पणाच्या सामन्यातच अर्धा संघ धाडला तंबूत
“आता बुमराह-शमीच्या पुढे पाहायची वेळ आलीये”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---