IND Vs ENG: भारत विरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज शोएब बशीर पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या प्लेइंग 11 चा भाग असणार नाही. व्हिसाच्या समस्येमुळे बशीर पहिल्या कसोटीत संघाचा भाग होऊ शकत नाही, असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने म्हटले आहे. बशीरला इंग्लंडला परतावे लागले आहे. या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये बशीर खेळू शकणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण घटनेने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) चांगलाच संतापला आहे. 20 वर्षांचा शोएब बशीर (Shoaib Bashir) पहिल्यांदाच भारतात येणार होता. पण व्हिसाच्या अडचणींमुळे बशीरचे पदार्पणाचे स्वप्न तूर्तास तरी पूर्ण होणार नाही. याआधी पाकिस्तानी वंशाच्या उस्मान ख्वाजा आणि रेहान अहमद यांनाही विश्वचषकादरम्यान भारत दौऱ्यावर असताना व्हिसा विलंबाच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. (england ben stokes into trouble as pakistan origin spinner shoaib bashir out from 1st test)
बेन स्टोक्स म्हणाला, “खरोखर हे चांगले नाही. युवा खेळाडू कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मी समजू शकतो. या सर्व गोष्टींचा खूप वाईट परिणाम होतो. मैदानाबाहेर होणाऱ्या या प्रकरणांमुळे तुमची कामगिरीही ढासळते. मला खूप वाईट वाटत आहे. युवा खेळाडूसाठी ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे.”
बशीरला वगळणे इंग्लंडसाठी अडचणीचे ठरले आहे. बशीरने अलीकडेच इंग्लंड लायन्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जोरावर त्याला राष्ट्रीय संघात बोलावण्यात आले. भारतातील फिरकीपटूंसाठी अनुकूल खेळपट्टीवर बशीर इंग्लंडचे ट्रम्प कार्ड ठरू शकला असता. मात्र व्हिसाच्या समस्येमुळे बशीरला भारताविरुद्ध खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (IND vs ENG Big blow to England team Pakistani origin Bashir out of first test)
हेही वाचा
श्रेयस अय्यर-यशस्वी जयस्वालसह ‘या’ खेळाडूंनी जिंकला ‘बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मॅन’ पुरस्कार, पाहा यादी
मोठी अपडेटः पहिल्या 2 टेस्टसाठी विराटच्या जागी RCBच्या स्टार क्रिकेटरची टीम इंडियात निवड