भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे बिगुल वाजले आहे. माजी क्रिकेटपटू आणि जाणकार या मालिकेविषयी आपली मते मांडत आहेत. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही आगामी मालिकेच्या निकालाविषयी भविष्यवाणी केली आहे. इंग्लड भारतात एकही कसोटी जिंकणार नाही, असे गंभीर याने म्हटले.
शुक्रवारी सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
नव्या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
कसोटी मालिका ठरू शकते एकतर्फी
भारताच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक राहिलेल्या गंभीर याने आगामी मालिकेविषयी एका क्रीडा प्रसारण वाहिनीवर आपली मते मांडली. तो म्हणाला, “मला वाटते इंग्लडचे फिरकी गोलंदाजी आक्रमण कमजोर आहे. भारतात सर्वोत्तम कामगिरी करतील असे गोलंदाज संघात नाहीत. या गोलंदाजांच्या भरवशावर भारताला आव्हान देणे इंग्लंडसाठी कठीण जाईल.”
गंभीर मालिकेच्या निकालाविषयी बोलताना म्हणाला, “इंग्लंडने ही मालिका बरोबरीत राखली तरी मोठी गोष्ट असेल. मी अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतच फक्त इंग्लंडला विजयाची संधी देईल. ही कसोटी दिवस-रात्र स्वरूपाची आहे. मालिकेचा निकाल ३-० किंवा ३-१ असा लागू शकतो. इंग्लिश कर्णधार जो रूट चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी भारतातील परिस्थिती वेगळी आहे. कारण, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असेल.”
दीर्घ दौऱ्यासाठी दाखल झाला आहे इंग्लंड संघ
इंग्लंडचा संघ भारतात दीर्घ दौऱ्यासाठी २५ जानेवारी रोजी दाखल झाला आहे. या दौऱ्यावर इंग्लंड संघ चेन्नई येथे दोन व अहमदाबाद येथे दोन कसोटी सामने खेळेल. त्यानंतर अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी२० मालिका होईल. दौऱ्याची सांगता पुणे येथील तीन वनडे सामन्यांनी होईल.
महत्वाच्या बातम्या:
आरंभ है प्रचंड! भारतीय संघाचे खेळाडू उतरले चेपॉकच्या मैदानात, पाहा फोटो
भारत आणि इंग्लंड संघातील असे ८ खेळाडू, ज्यांच्यात आहे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील रोमहर्षक कसोटी सामने, एक तर सुटला होता बरोबरीत