अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आजपासून (१२ मार्च) टी-२० सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तसेच ही मालिका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. तत्पुर्वी इंग्लंड संघाच्या कर्णधाराने भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या टी-२० सामन्याच्या एक दिवसापूर्वी झालेल्या वर्चुअल पत्रकार परिषदेत ऑयन मॉर्गन याने म्हटले की, “आम्हाला आमची क्षमता जाणून घेण्याची एक चांगली संधी आहे. कारण, विश्वचषक स्पर्धेला अवघे ७ महिने उरले आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असणाऱ्या भारतीय संघाला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत करणे कठीण आहे.”
भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार
भारत-इंग्लंड यांच्यातील टी२० मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे सात महिने उरले आहे. याबाबत बोलताना मॉर्गन म्हणाला, “भारतीय संघाला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत करणे कठीण आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन देखील भारतातच होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल. ही मालिका आमच्यासाठी खूप कठीण असणार आहे आणि आमच्यापुढे विजयाचे आव्हान देखील असणार आहे.”
आमचे सर्व खेळाडू फिट
मॉर्गन म्हणाला, “इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू फिट आहेत. तसेच संघात समाविष्ट होण्यासाठी उपलब्ध आहेत. यात जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरचा देखील समावेश आहे. संघात कोणाला संधी मिळेल याबाबत आताच सांगू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
T20 Series: हे आहेत ३ गोलंदाज, जे दुखापतग्रस्त टी नटराजनची घेऊ शकतात जागा
‘थाला’चा मोठा डावपेच, आयपीएल २०२१ पुर्वी ‘नव्या मलिंगा’ला संधी; गोलंदाजी पाहून चक्रावून जाल
जेसन होल्डरची नेतृत्त्वपदावरुन कायमची सुट्टी, ‘हा’ खेळाडू विंडीज कसोटी संघाचा नवा कर्णधार