अलीकडेच भारतीय नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी 10 कलमी शिस्तपालन नियम जारी केले आहेत, ज्यामध्ये दौऱ्यांदरम्यान कुटुंबासोबत मर्यादित वेळ घालवण्याच्या तरतुदीमुळे वाद निर्माण झाला आहे. यावर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्याने बीसीसीआयचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मंगळवारी (21 जानेवारी) सांगितले की, लांब विदेशी दौऱ्यांमध्ये कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याचा कामगिरीवर फारसा परिणाम होत नाही. बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खेळाडू 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या दौऱ्यावर त्यांच्या कुटुंबियांसोबत 2 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ घालवू शकत नाहीत.
जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला की, “हे महत्वाचे आहे की, आपण आधुनिक जगात राहतो आणि दौऱ्यावर असताना तुमच्यासोबत कुटुंब असणे खूप छान आहे. आजकाल खूप क्रिकेट खेळले जात आहे आणि खेळाडू घराबाहेर बराच वेळ घालवतात, कोरोनानंतर यावर बरीच चर्चा झाली आहे, कुटुंबासोबत राहिल्याने खेळात फारसा फरक पडतो असे मला वाटत नाही.”
पुढे बोलतना बटलर म्हणाला, “सर्वकाही हाताळता येते, वैयक्तिकरित्या माझा असा विश्वास आहे की, कुटुंबासोबत राहून घरापासून दूर राहण्याचे ओझे हलके करता येते आणि हे खूप महत्वाचे आहे.”
भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. टी20 मालिकेची सुरूवात उद्यापासून (22 जानेवारी) होणार आहे. दोन्ही संघातील पहिला टी20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे, तर भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakuamr Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक कोण? केएल राहुल की रिषभ पंत? पाहा आकडेवारी
भारत-इंग्लंड पहिल्या टी20 सामन्यादरम्यान कसे असणार हवामान?
स्वप्नवत कामगिरी! पदार्पणात हॅट्ट्रीक घेत 19 वर्षीय खेळाडूनं रचला इतिहास, भारताचा सहज विजय