गतविजेता इंग्लंड क्रिकेट संघ भारतात आपल्या विश्वचषकाचा बचाव करण्यासाठी भारतात आला आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मोठ्या अंतराने पराभूत केल. त्यानंतर आता आपल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हा सामना धर्मशाला येथे खेळला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने मैदानाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
इंग्लंडला आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत हवे लागले होते. तर, दुसरीकडे बांगलादेशने अफगाणिस्तानला मात देत चांगली सुरुवात केलेली. मंगळवारी (10 ऑक्टोबर) हा सामना धर्मशाला येथे खेळला जाईल. मात्र, या मैदानाचे आउटफिल्ड खराब असल्याचे दिसत आहे. सीमारेषेजवळ काही ठिकाणी थेट माती निघत असल्याचे दिसून आले. याबाबत बोलताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला,
“माझ्यामते हे अत्यंत खराब आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्ररक्षकांना सांगू शकत नाही की ईथे सूर मारू नका. तुम्हाला संघासाठी धावा वाचवायच्या असतात. मात्र हे तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक करावे लागेल. विश्वचषकातील सामन्यांसाठी ही आदर्श आऊटफिल्ड नाही. मात्र, तुम्ही याचा कारण म्हणून वापर करू शकत नाही. तुम्हाला याच्याशी जुळवून घ्यावे लागेल. विश्वचषकातील सामने तुम्ही अशा ठिकाणी कधीही खेळू इच्छित नाही.”
यापूर्वी विश्वचषकातील दुसरा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान याच मैदानावर झाला होता. त्या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू मुजीब उर रहमान हा क्षेत्ररक्षण करताना अडखळला होता. त्यावेळी मैदानाच्या आऊटफिल्डची मातीवर निघून आलेली.
(England Captain Unhappy With Dharamshala Stadium Outfield)
महत्वाच्या बातम्या –
आले किती गेले किती, पण वनडेतील ‘चेज मास्टर’ विराटच; सरासरी पाहून तोंडात घालाल बोटे
जिथं सचिन, तिथं विराट! वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ‘एवढ्या’ वेळा ठोकल्या 50 हून अधिक धावा