चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी आज (१२ फेब्रुवारी) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघातून जोफ्रा आर्चरसह ४ प्रमुख खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्याजागी ४ नव्या खेळाडूंना संघात सहभागी करण्यात आले आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितल्यानुसार, इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुखापतीमुळे बाहेर ठेवण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या हाताच्या कोपऱ्याला वेदना होत होत्या. त्या वेदनेत वाढ झाल्याने त्याला इंजेक्शन घ्यावे लागले आहे. आर्चरच्या जागी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला जागा देण्यात आली आहे.
तसेच संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन यालाही दुसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याबरोबरच पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू डोमिनिक बेसलाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. त्यांच्याजागी ख्रिस वोक्स आणि ओली स्टोन या गोलंदाजांना संघात सहभागी करण्यात आले आहे.
सोबतच यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याला डच्चू देत बेन फोक्सची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी फोक्सच्या खांद्यावर असेल. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू मोईन अली यालाही संघात जागा मिळाली आहे. उर्वरित संघ पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे असेल.
https://twitter.com/ESPNcricinfo/status/1360120737449734147?s=20
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ –
डोमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, जॅक लीच, ख्रिस वोक्स, ऑली स्टोन, स्टुअर्ट ब्रॉड
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचे ‘हे’ ७ खेळाडू बसणार बाकावर?
‘तो महान गोलंदाज आहे आणि वयानुसार…,’ अंडरसनविषयी ट्विट करत स्टेनने संपवल तुलनेचं सत्र
अक्रमसारखा वेगवान गोलंदाज बनण्याची स्वप्ने पाहणारा नदीम ‘असा’ बनला फिरकीपटू






