इंग्लंड संघाचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने नुकताच कसोटी क्रिकेट मध्ये ६०० विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि अँडरसन यांच्यात तुलना केली जात असत. परंतु आता स्टेनने एक भन्नाट ट्विट करत या तुलनेच्या सत्रावर पूर्णविराम लावला आहे.
सध्या अँडरसन हा इंग्लंडच्या कसोटी संघाकडून प्रमुख वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडतोय आणि इंग्लंड संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकवून देत आहे. तर दुसरीकडे स्टेनने दक्षिण आफ्रिका संघातून निवृत्ती घेतली आहे. अनेक दिग्गजांच्या म्हणण्यानुसार, जर स्टेन कसोटी क्रिकेट खेळत राहिला असता, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम स्टेनच्या नावेच असता.
डेल स्टेनने ट्विट करत संपवले तुलनेचे सत्र
इंग्लंड संघाचा प्रमुख गोलंदाज अँडरसन आणि दक्षिण आफ्रिका संघाचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेन यांच्यातील तुलना करण्याचे सत्र आता संपले आहे. स्वतः स्टेनने ट्विट करत अँडरसनचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “फक्त एका तुलनेची गरज आहे की, जिम्मी अजूनपर्यंत खेळत आहे आणि मी माझ्या २०-२० सोफ्यावर बसून त्याला पाहत आहे. तो महान क्रिकेटपटू आहे आणि वयाबरोबर तो अजुनच उत्कृष्ट होत आहे.” असे ट्विटमध्ये स्टेनने लिहिले आहे.

आशियातील अँडरसन आणि स्टेन यांची कामगिरी
सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जेम्स अँडरसन याने आपल्या गोलंदाजीने महत्वाच्या फलंदाजांना बाद केले होते. त्याने एका पाठोपाठ ३ भारतीय फलंदाजांना माघारी धाडले होते. अवघ्या ३० चेंडूत अँडरसनने भारतीय संघाकडून सामना हिसकावून घेतला होता. याआधी झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील अँडरसनने एका डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या. तरीसुद्धा तो स्टेनच्या आशियामधील कामगिरीच्या आसपास सुद्धा पोहचू शकला नाहीये. स्टेन याने आशिया मध्ये ४२.९ च्या स्ट्राईक रेटने २४.११ च्या सरासरीने ९२ विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसरीकडे अँडरसन याचा स्ट्राइक रेट खूप जास्त आहे. त्याने ६४.३ च्या स्ट्राइक रेटने २८ च्या सरासरीने ७१ विकेट्स चटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचे ‘हे’ ७ खेळाडू बसणार बाकावर?
अक्रमसारखा वेगवान गोलंदाज बनण्याची स्वप्ने पाहणारा नदीम ‘असा’ बनला फिरकीपटू
आपल्याच नात्यातील मुलीवर झाले होते सेहवागला प्रेम, घरच्यांच्या विरोधानंतरही यशस्वी ठरली लव्हस्टोरी




