२५ जून रोजी ईसीबी नॅशनल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत पीटरबोर्ग टाऊन विरुद्ध हाई वायकोंब यांच्यात झालेल्या रंगतदार एकदिवसीय सामन्यात पीटरबोर्ग टाऊनने हाई वायकोंब संघावर रोहमर्षक विजय मिळवला.
पीटरबोर्ग संघाने प्रथम फलंदाजी करत ३९.३ षटकाच सर्वबाद १८८ धावा बनवल्या. विजयासाठी १८९ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या हाई वायकोंब संघाचा या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला.
हाई वायकोंब संघाने या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. वायकोंब संघाने ३८ षटकात तीन बाद १८६ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी १२ षटकात ३ धावांची गरज होती.
मात्र पीटरबोर्ग टाऊन संघाच्या केरोन जोंस आणि पार्ट टाइम गोलंदाज डेनिएल मलिकने पुढच्या ११ चेंडूत हाई वायकोंब संघाचे ७ फलंदाज १ धावेच्या मोबदल्या बाद करत अविस्मरणीय विजय मिळवला.
३९ व्या षटकात चार फलंदाज बाद करत केरोन जोंसने हे षटक निर्धाव टाकले. तर ४० व्या षटकात डेनिएल मलिकने १ धाव देत राहीलेले तीन फलंदाज बाद करत सामना खिशात टाकला.
How it happened ball by ball #miracle pic.twitter.com/J52umhbBIN
— Peterborough Town Cricket Club (@pborotowncc) June 25, 2018
या सामन्यात हाई वायकोंब संघाचे तब्बल सात फलंदाज शून्य धावसंखेवर बाद झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही
-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी