इंग्लंड महिला क्रिकेट या महिन्याच्या अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी संघ उत्सुक असतानाच मोठी बातमी पुढे आली आहे. संघाची दिग्गज खेळाडू कॅथरीन ब्रंट (Katherine Brunt) हीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. यापुढे ती फक्त मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
इंग्लंड संघाची वेगवान गोलंदाज कॅथरीनने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिच्या या निर्णयामुळे ती २७ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात खेळणार नाही. हा सामना काउंटी ग्राऊंड, टाँटन येथे खेळला जाणार आहे.
https://www.instagram.com/p/CQeTJdND04j/?utm_source=ig_web_copy_link
कॅथरीनने २००४मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात तिने ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या एका वर्षानंतरच तिने संघाला ४२ वर्षानंतर ऍशेस मालिका जिंकून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली होती. २००५च्या या ऍशेस मालिकेत तिने दोन सामन्यात १४ विकेट्स घेत अर्धशतक केले होते. या तिने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात नऊ विकेट्स घेत अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात तिने प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवला होता.
“एक खेळाडू म्हणून तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टीपासून दुर जाण्याचा विचार करावा लागतो. मी मागील दोन वर्षापासून निवृत्ती घेण्याचा विचार करत होते,” असे कॅथरीनने म्हटले आहे.
कॅथरीनने तिच्या १८ वर्षाच्या कारकिर्दीत १४ कसोटी सामने खेळले असून २.५२च्या इकॉनॉमी रेटने ५१ विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात झालेली ऍशेस मालिका तिच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका ठरली आहे. या मालिकेतील एकमेव सामन्यात तिने पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या शोधात ‘या’ खेळाडूंकडे झाले दुर्लक्ष, सोशल मीडियावरील युझर्सच्या तिखटं प्रतिक्रिया एकदा बघाच
‘याच’ खेळाडूंना मिळणार इंग्लंड दौऱ्यात संधी, द्रविडचे नाव घेत गांगुलीने दिले संकेत
निवृत्त झाल्यानंतरही धोनी विजयाचे कारण ठरतोय, खुद्द पंड्यानेच उलघडलं गूपित