14 जूलैला लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड क्रिकेट संघाने 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि 44 वर्षांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पुर्ण केले. हे विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईकडून इंग्लंड संघाला गुरुवारी(29 ऑगस्ट) कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट भेट मिळाला आहे.
2019 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकल्यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने खास कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट इंग्लंड संघाला भेट देणार असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या होत्या.
त्यानंतर आता हा कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट इंग्लंड संघाला गुरुवारी मिळाला आहे. याचे फोटो इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तसेच डब्ल्यूडब्ल्यूई यूकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये इंग्लंड संघातील जोफ्रा आर्चर, जॉस बटलर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय आणि जो रुट हे खेळाडू कस्टम चॅम्पियनशिप बेल्टसह दिसून येत आहेत. या कस्टम चॅम्पियनशिप बेल्टवर इंग्लंड क्रिकेड बोर्डाचा लोगोही आहे.
हे फोटो पोस्ट करताना इंग्लंड बोर्डाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘बेल्ट पोहचला आहे. धन्यवाद @WWE आणि @WWEUK’
The title has landed! ????????
Thank you @WWE and @WWEUK! #WeAreEngland#ExpressYourself pic.twitter.com/da15DsNjYr
— England Cricket (@englandcricket) August 29, 2019
तसेच डब्ल्यूडब्ल्यूई यूकेने कॅप्शन दिले आहे की ‘विश्वचषक विजेतेपद मिळवल्याबद्दल इंग्लंड संघाला कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट मिळाला आहे.’
https://twitter.com/WWEUK/status/1166977705788747776
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अर्जून पुरस्कार मिळाल्यानंतर रविंद्र जडेजाने दिली ही प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ
–..म्हणून एमएस धोनीची झाली नाही भारताच्या टी२० संघात निवड, एमएसके प्रसादने केला खूलासा
–दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीला संधी नाही





