पुढील महिन्यात 15 सप्टेंबरपासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने काल(29ऑगस्ट) भारतीय संघाची निवड केली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच पसंती मिळाली आहे.
धोनीला संघात संधी न देण्यामागील कारण बीसीसीआय निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार प्रसाद यांनी माहिती दिली की धोनीने स्वत: तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी अनुपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
प्रसाद म्हणाले, ‘हो, तो निवड प्रक्रियेसाठी अनुपलब्ध होता.’
धोनी ऑगस्ट महिन्यातील वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीही अनुुपलब्ध होता. त्यावेळी त्याने क्रिकेटमधून 2 महिन्याचा ब्रेक घेतला असल्याचे वृत्त होते. या ब्रेकच्या दरम्यान धोनी 15 दिवस भारतीय सेनेत ट्रेनिंग घेत होता. या ट्रेनिंगनंतर तो सध्या अमेरिकेत आहे.
त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध खेळलेला भारताचा टी20 संघच पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी कायम करण्यात आला आहे. फक्त या संघात भुवनेश्वर कुमार ऐवजी हार्दिक पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
हार्दिकला वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी विश्रांती दिली होती. हा एकमेव बदल भारतीय संघात झाला आहे.
त्याचबरोबर या संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संधी न देण्यामागील कारण सांगताना प्रसाद म्हणाले, ‘आम्ही फिरकीपटूंचा एक पूल(गट) तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल चाहर, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर अशा फिरकीपटूंनी मागील मालिकेत चांगली कामगिरी केली आहे आणि ते आणखी एका संधीसाठी पात्र आहेत.’
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीला संधी नाही
–काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर
–स्टिव्ह स्मिथ म्हणला, आर्चरने डोक्याला चेंडू मारला पण मला आऊट केले नाही…