---Advertisement---

IND vs ENG: मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने रचला इतिहास! 61 वर्षांचा ‘हा’ जुना रेकाॅर्ड मोडला

On: शनिवार, जुलै 26, 2025 6:41 PM
---Advertisement---

India vs England 4th Test: मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा पहिला डाव 358 धावांवर आटोपला होता, त्यामुळे इंग्लंडला 311 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. इंग्लिश संघासाठी बेन स्टोक्स आणि जो रूटने शतके झळकावत अनेक नवे रेकाॅर्ड केले. रूटने 150 धावा आणि स्टोक्सने 141 धावांची खेळी केली. तर भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज रवींद्र जडेजा ठरला, ज्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाचा पहिला डाव 358 धावांवर आटोपला होता. साई सुदर्शन, यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंतने भारतासाठी अर्धशतकी खेळी केली. जेव्हा इंग्लंड संघ फलंदाजीला आला तेव्हा बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. डकेटने 94 धावा आणि क्रॉलीने 84 धावा केल्या. ऑली पोपनेही 71 धावांचे योगदान दिले, परंतु भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या तिन्ही टॉप ऑर्डर फलंदाजांना शतक झळकावण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले.

मँचेस्टर मैदानावर इंग्लंडने कोणत्याही एका डावात सर्वात मोठा कसोटी स्कोअर (Highest Test Score in an Innings) केला आहे. आतापर्यंत मँचेस्टरवर सर्वात मोठा स्कोअर करण्याचा रेकाॅर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी 1964 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच डावात 656 धावा केल्या होत्या, परंतु आता इंग्लंडने 669 धावा करून हा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे.

जो रूटने या सामन्यात 150 धावांची खेळी केली, ज्याच्या बळावर तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा (Most Runs in Test History) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. आता फक्त सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे, ज्याने कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. तर रूटने 13,409 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके (Most Test Centuries vs India) झळकावण्याचा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला.

दुसरीकडे, स्टोक्स कर्णधार म्हणून एकाच कसोटीत 5 विकेट्स आणि शतक (5 Wickets and a Century as Captain) झळकावणारा जगातील केवळ 5वा खेळाडू (5th Player in the World) बनला आहे. असे करणारा तो इंग्लंडचा पहिला कसोटी कर्णधार (First England Test Captain) आहे. त्याचबरोबर त्याने कसोटीत 7,000 धावा आणि 200 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---