इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात १४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मात्र इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे त्यांचा नववर्षात होणारा श्रीलंका दौरा संभ्रमात होता. परंतु श्रीलंकेला रवाना होण्यापुर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले. त्यामुळे इंग्लंड संघाने श्रीलंकाला जाण्यासाठी उड्डाण भरले होते. रविवारी (३ जानेवारी) सकाळी इंग्लंड संघ श्रीलंकाला पोहोचला असून त्यांचा विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत कर्मचारी पीपीई कीट घालून विमानतळावर उपस्थित असल्याचे दिसत आहे. ते इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना एका रांगेत उभे करुन त्यांना सॅनिटाईज करताना दिसत आहेत. तसेच काही कर्मचारी खेळाडूंचे सामान घेऊन सॅनिटाईज करताना दिसत आहेत. त्यानंतर विमानतळावर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आल्याचे दिसत आहे.
कोविड-१९ प्रोटोकॉलनुसार इंग्लंड संघाचे सर्व सदस्य श्रीलंकामध्ये पोहोचल्यानंतर काही दिवस विलगीकरणात राहणार आहेत. त्यानंतर २ दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. दरम्यान कोरोना निगेटिव्ह आढळलेल्या खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाईल.
The @englandcricket have arrived in Sri Lanka. Stringent quarantine on arrival at the airport. Great to be here. ???????????? pic.twitter.com/aYYDxorKPZ
— Danny Reuben (@dannyreuben) January 3, 2021
https://twitter.com/dannyreuben/status/1345610314293911553?s=20
.@englandcricket captain @root66 addresses local media on arrival at the airport. pic.twitter.com/ZdE5TmFC8b
— Danny Reuben (@dannyreuben) January 3, 2021
श्रीलंका संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
जरी इंग्लंड संघ श्रीलंकेला पोहोचला असला; तरी श्रीलंका संघ अद्याप दक्षिण आफ्रिकामध्ये आहे. तिथे दोन्ही देशात २६ डिसेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून दक्षिण आफ्रिकाने एक डाव ४५ धावांनी हा सामना जिंकला आहे. दुसरा व शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. हा सामना संपल्यानंतर श्रीलंका संघ मायदेशी परतेल.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड दरम्यान होणार २ कसोटी सामने
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात १४ जानेवारी रोजी होईल. १८ जानेवारीपर्यंत पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर २२ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत दुसरा कसोटी सामना होईल. हे दोन्ही सामने श्रीलंकाच्या गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येतील.
श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंड संघ येणार भारत दौऱ्यावर
श्रीलंकेचा दौरा संपल्यानंतर इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिका होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
संकट टळले! इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह, लवकरच ‘या’ दौऱ्यासाठी भरणार उड्डाण
पुजारा, पृथ्वी शॉ आणि मॅथ्यू वेड झाले दुखापतग्रस्त, तिघांबाबत होते ‘हे’ साम्य






