---Advertisement---

पुजारा, पृथ्वी शॉ आणि मॅथ्यू वेड झाले दुखापतग्रस्त, तिघांबाबत होते ‘हे’ साम्य

On: रविवार, जानेवारी 3, 2021 11:12 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबर असल्याने तिसऱ्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दृष्टीने दोन्ही संघातील खेळाडू उत्तम सराव करत आहेत. मात्र या दरम्यान दोन्ही संघासाठी चिंतेची बाब घडली असून, भारतीय संघाचे खेळाडू चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ तसेच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेड सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाले आहेत.

शनिवारी(2 जानेवारी) सराव करत असताना चेतेश्वर पुजाराच्या हाताला चेंडू लागल्याने तो दुखापतग्रस्त झाला. पुजाराने काही काळ सरावातून ब्रेक घेतला, मात्र त्यानंतर पुन्हा सज्ज होऊन तो सरावासाठी उपस्थित झाला. पुजारा पाठोपाठच त्या नेटमध्ये सराव करत असलेला पृथ्वी शॉ देखील दुखापतग्रस्त झाला होता. भारतीय संघाच्या सरावानंतर ऑस्ट्रेलियन संघ सरावासाठी आल्यानंतर त्याच नेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेड देखील दुखापतग्रस्त झाला. मात्र काही वेळा नंतरच बातमी समोर आली की, तिन्ही खेळाडूंची दुखापत फारशी गंभीर नसून आगामी सामन्यासाठी ते पूर्णतः सज्ज आहेत.

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणार आहे. कोरोनाची विविध खबरदारी घेऊन सामना पार पाडणे, हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघटनेसमोरचे मोठे आव्हान असणार आहे. दोन्ही संघांमध्ये त्यांचे नियमित सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांचे पुनरागमन झाले असून, दोन्ही संघांना आशा असेल की हे खेळाडू तिसऱ्या सामन्यात उत्तम कामगिरी करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

लवकर बरा हो दादा! आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनाईकने ‘अशी’ केली गांगुलीसाठी प्रार्थना, ट्विट व्हायरल

अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती

काय सांगता! सराव सत्रात ‘या’ प्रमुख भारतीय फलंदाजाच्या हाताला जोरदार चेंडू लागला अन्…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---