इंग्लंड क्रिकेट संघासाठी विश्वचषक 2023 स्पर्धा खास ठरली नाही. त्यांना उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नाही. अशात आता इंग्लंड संघाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. संघ विश्वचषकातील प्रदर्शन विसरून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंड (England) संघाला 3 डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. ही 3 सामन्यांची वनडे मालिका असेल. यानंतर उभय संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना 12 डिसेंबर रोजी बार्बाडोस येथे खेळला जाईल. या दोन मालिकांसाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे.
We've announced our squads for our upcoming tour of the Caribbean 👇
— England Cricket (@englandcricket) November 12, 2023
वनडे आणि टी20 दोन्ही संघांचे नेतृत्व जोस बटलर (Jos Buttler) याच्याकडेच असणार आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत संघाने चांगले प्रदर्शन केले नसले, तरीही बटलरला कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला संघात सामील केले नाहीये. स्टोक्स पूर्णपणे फिट नव्हता, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त डेविड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या खेळाडूंनाही विश्वचषकात जागा दिली गेली नाहीये. या संघात काही नवीन खेळाडूंना सामील केले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गस एटकिन्सन, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्राऊले, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, ओली पोप, फिल सॉल्ट, जोश टंग आणि जॉन टर्नर.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गस एटकिन्सन, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, रीस टोप्ली, जॉन टर्नर आणि ख्रिस वोक्स. (england cricket team squad announced for the odi and t20 series vs west indies)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे जबरदस्त विधान; सेमीफायनलमधील ‘या’ डोकेदुखीविषयी स्पष्टच बोलला
टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचा शाकिबला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो…’