क्रिकेट विश्वातून आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. जे की इंग्लंड क्रिकेट संघाच्या निगडीत आहे. इंग्लिश संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या ह्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक, मलान बराच काळ संघाबाहेर होता. 2023 एकदिवसीय विश्वचषकापासून त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. मलानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही, पण ती संस्मरणीय होती. त्यानं टी20 मध्ये 1800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याच्या नावे 1400 हून अधिक धावा आहेत. तो बराच काळ टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.
DAWID MALAN RETIRES FROM INTERNATIONAL CRICKET…!!!! 🌟 pic.twitter.com/riPkynGETi
— Johns. (@CricCrazyJohns) August 28, 2024
अलीकडेच इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित फाॅरमॅटच्या क्रिकेट मालिकेसाठी त्यांचा संघ जाहीर केला. ज्यामधून अनेक प्रमुख खेळाडूंना वगळण्यात आले. आता संघ भविष्याकडे पाहत असल्याचे स्पष्ट संकेत इंग्लिश संघाने दिले. आता या दरम्यान डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मलानची इंग्लंड संघात बराच काळ निवड झाली नव्हती. तो नुकताच द हंड्रेड स्पर्धेत खेळताना दिसला. मलानने आपल्या कारकिर्दीत बहुतांश वेळा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बरेच यश मिळवले. मात्र, मलानला इतर आक्रमक फलंदाजांमुळे संघात नियमित स्थान मिळवणे कठीण झाले होते.
डेव्हिड मलानच्या आंतरराष्ट्रीय करिअरबाबत बोलायचे झाल्यास, त्याने संघासाठी 22 कसोटी सामने खेळल्या. ज्याच्या 39 डावात त्याने 1074 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 30 सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्तव केला आहे. या दरम्यान त्याने 7 अर्धशतके आणि 6 शतकांच्या जोरावर 1450 धावा केल्या. क्रिकेट फाॅरमॅटमध्ये मलानने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक टी20 सामने खेळला आहे. त्याने 62 टी20 सामने खेळला. या दरम्यान त्याने जवळपास 133 च्या स्ट्राईक रेटने 1892 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 16 अर्धशतके तर 1 शतक झळकावले आहे.
हेही वाचा-
ICC Champion’s Trophy 2025: जय शाह हिसकावून घेणार पाकिस्तानचे यजमानपद?
राजस्थान फ्रँचायझीला मोठा फटका, स्पर्धेपूर्वीच दिग्गज खेळाडू बाहेर
झहीर खान लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील होणार? मोठी अपडेट समोर