सध्या युरोपमध्ये सर्वत्र युरो कप २०२० या फुटबॉल स्पर्धेची चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत २९ जूनला इंग्लंड विरुद्ध जर्मनी या दोन देशात सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने कर्णधार हॅरी केन आणि रहीम स्टर्लिंग यांनी केलेल्या गोलमुळे सामना २-० असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. इंग्लंड फुटबॉल संघाच्या या यशाचा आनंद इंग्लंडच्या क्रिकेट संघानेही जोरदार साजरा केला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाची सध्या श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील २९ जून रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे हा सामना संपल्यानंतर सध्या इंग्लंडचे क्रिकेटपटू एकत्र असल्याने त्यांनी इंग्लंड फुटबॉल संघाचा जर्मनीविरुद्धचा सामना देखील एकत्र बसून पाहिला. यावेळी इंग्लंड क्रिकेटपटूंनी बिअर पिण्याचाही आनंद घेतला. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर देखील करण्यात आला आहे.
GET IN @England!!! 🦁🦁🦁 #Euro2020 #ItsComingHome pic.twitter.com/ZFbRuhizvy
— England Cricket (@englandcricket) June 29, 2021
इंग्लंड फुटबॉल संघाने जिंकला सामना
जर्मनीविरुद्ध झालेल्या सामन्यात उत्तरार्धात इंग्लंडकडून स्टर्लिंगने ७५ व्या मिनिटाला आणि केनने ८६ व्या मिनिटाला गोल केलाय युरो २०२० मध्ये केनचा हा पहिलाच गोल होता. हा सामना इंग्लंड संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्यासाठीही भावूक करणारा होता. कारण ज्या वेम्बले स्टेडियममध्ये हा सामना झाला, त्याच स्टेडियममध्ये १९९६ साली युरो कप स्पर्धेत इंग्लंडचा संघ साऊथगेट यांच्याकडून पेनल्टीवर गोल करण्यास चुकल्याने अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात अपयशी ठरला होता. त्याच सामन्यात गोलकिपर असलेले डेविड सिमॉन हे देखील २९ जूनला स्टेडियममध्ये उपस्थित होते.
इंग्लंड विरुद्ध जर्मनी सामन्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित
इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यात झालेल्या सामन्यांसाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. या सामन्यासाठी प्रिंस विलियम, त्यांची पत्नी केट आणि ७ वर्षीय मुलगा जॉर्ज उपस्थित होते. याशिवाय माजी फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम, एड शीरन हे देखील होते. त्याचबरोबर भारताचा यष्टीरक्षक फलंजाज रिषभ पंतही आपल्या मित्रांसह हा सामना पाहाण्यासाठी गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर तुम्ही कोठेही ट्रेनिंग घेऊ शकता’, म्हणत सिनीयर पंड्याने सुरु केला सराव
रॉस टेलर निवृत्ती घेणार का? ३७ वर्षीय फलंदाजाने दिले ‘हे’ उत्तर