भारत आणि इंग्लंड महिला संघात बुधवारी (5 नोव्हेंबर) आमना सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभय संघांतील या टी-20 मालिकेची सुरुवात झाला. पहिल्याच सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारताला 38 धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या विजयात डॅनियल वॅट, नेट सायव्हर ब्रंट आणि सोफी एक्लेस्टोन यांनी दिलेले योगदान महत्वाचे ठरले.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारीत 20 षटकांमध्ये इंग्लंडमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ मात्र हे लक्ष्य गाठू शकला नाही. 20 षटकांमध्ये भारतीय संघ 6 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतासाठी एकट्या शेफाली वर्मा (52) हिने अर्धशतक केले. स्मृती मंधाना (6) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (4) यांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर (26), रिचा घोष (21), आणि कनिका अहुजा (15) यांनाही समाधानकारक खेली करता आली नाही.
दुसरीकडे इंग्लंडसाठी डॅनियल वॅट हिने 75, तर नेट सायव्हर ब्रंड हिने 77 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलामीवीर सोफिया डंकले (1) आणि कर्णधार हेदर नाईट (6) एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऍलिस कॅप्सी एकही धाव करू शकली नाही. यष्टीरक्षक फलंदाज एमी जोन्स अवघ्या 23 धावांवर बाद झाली. गोलंदाजी विभागात सोफी एक्लेस्टोन हिने 4 षटकात 15 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. नेट सायव्हर ब्रंट, फ्रेया केम्प आणि राहा ग्लेन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तत्पूर्वी भारतासाठी राधिका सिंग हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्रेयांका पाटील हिने 2, तर साकिया इशाक हिने एक विकेट घेतली. (England defeated India in the first T20 match)
A good all-round performance sees England take a 1-0 lead in Mumbai in the three-match series ????
???? #INDvENG: https://t.co/Xuy9cxTdMP pic.twitter.com/LDchDgv7Lb
— ICC (@ICC) December 6, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, दिप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पुजा वस्त्राकर, कनिका कहुजा, रेणुका सिंग, साकिया इशाक.
इंग्लंड – डॅनियल वॅट, सोफिया डंकले, ऍलिस कॅप्सी, नेट सायव्हर-ब्रंट, हेदर नाईट, एमी जोन्स (यष्टीरक्षक फलंदाज), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, मोहिका गौर.
महत्वाच्या बातम्या –
INDvsENG । नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडची प्रथम फलंदाजी, भारतासाठी दोघींचे पदार्पण
रवी बिश्नोईची मोठी झेप, बनला जगातील नंबर एकचा गोलंदाज! ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली महत्वाची






