नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी (७ ऑगस्ट) इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने ३०० धावांचा पल्ला गाठला. या दरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे.(England fans having some fun with Virat kohli)
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात २ रिव्ह्यू मिळत असतात. परंतु विराट कोहलीने चुकीचे रिव्ह्यू घेतल्यामुळे तेही गमावले होते. त्यामुळे अनेकदा असे निर्णायक क्षण आले होते, जिथे रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता होती. परंतु विराट कोहली रिव्ह्यू घेऊ शकत नव्हता. एक रिव्ह्यू भारतीय संघाने मोहम्मद सिराजच्या चुकीमुळे गमावला होता.
हा सामना पाहण्यासाठी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी खचाखच गर्दी केली होती. त्यांनी इंग्लंड संघाला समर्थन करण्यात काहीच कसर सोडली नाही. इतकेच नव्हे तर ते विराट कोहलीची खिल्ली देखील उडवत होते. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता भासत होती. तेव्हा इंग्लंडचे समर्थक विराट कोहलीकडे पाहून डीआरएसचा इशारा करत होते. परंतु विराट कोहलीने देखील माघार घेणाऱ्यातला नाही. त्याने पुढील षटकात इंग्लंडच्या चाहत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, जे पाहून जो रूटलाही हसू आवरले नाही.
"Go for the review"
The crowd is enjoying giving it to Kohli 😂#ENGvIND | #INDvENG pic.twitter.com/tmruyJ9XRJ
— Sridhar_FlashCric (@SridharBhamidi) August 7, 2021
Great shot of the crowd giving Virat Kohli grief over excessive appealing and wasting all his reviews… 😂😂😂😂 #ENGvIND pic.twitter.com/27frJixjTm
— Ben Rawson-Jones (@rawsonjones) August 7, 2021
Review for Joe Root's Hundred #ViratKohli 🤣😂#ENGvsIND pic.twitter.com/ud2efyY0vx
— xuenain (@meer_xuenain) August 7, 2021
जो रूटचे शतक
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने १४ चौकार लगावले. तर सॅम करणने ३२ आणि जॉनी बेअरस्टोने ३० धावांचे योगदान दिले. इंग्लंड संघाचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला.
भारतीय संघाला मिळाले २०९ धावांचे लक्ष्य
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर (७ ऑगस्ट) भारतीय संघाच्या धावा १ गडी बाद ५२ होत्या. यामध्ये केएल राहुल २६ धावा करत माघारी परतला आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा १२-१२ धावा करून मैदानावर टिकून आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांचेच लक्ष भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर टिकून असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG: रोहितचा कसोटी संघातून कटणार पत्ता? ‘हा’ युवा खेळाडू राहुलसह करणार ओपनिंग
फिरकीपटू राशिदच्या गोलंदाजीची दहशत! यष्टीरक्षकाने केली अशी काही कृती, चाहतेही गेले गोंधळून