टी20 विश्वचषकाला सुरु होण्यापूर्वीच क्रिकेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंड संघाच्या एका स्टार खेळाडूवर सट्टेबाजीमुळे बंदी घालण्यात आली आहे. या वेगवान गोलंदाजानं एक-दोन नव्हे तर तब्बल 303 सामन्यांवर सट्टा लावला होता. त्यानं आपली चुकी मान्य केली आहे.
इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्स याच्यावर एकूण 303 सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे. त्याला 16 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या 16 महिन्यांमध्ये तो 13 महिन्यांसाठी निलंबित असेल. कार्सवर दोन वर्षांहून अधिक कालावधीत विविध प्रकारच्या 303 क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावून भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यानं 2017 ते 2019 या कालावधीत हे कृत्य केलं.
कार्स यानं तो ज्या सामन्यांमध्ये खेळत होता, त्यावर सट्टा लावला नाही. ‘टेलिग्राफ’मधील एका वृत्तानुसार, त्यानं डरहमच्या सामन्यांवर पैसे लावले होते. त्याच्यावर लादण्यात आलेल्या बंदीनंतर, कार्सचा इंग्लंडमधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विचार केला जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) प्रवक्त्यानं सांगितलं की, “आम्ही या बाबी अतिशय गांभीर्याने घेतो आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचारविरोधी उल्लंघन खपवून घेत नाही.”
ब्रायडन कार्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
28 वर्षीय अष्टपैलू ब्रायडन कार्स इंग्लंडकडून 14 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्यानं 15 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं या दरम्यान 32 धावाही केल्या आहेत. कार्से यानं इंग्लंडकडून 3 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 विकेट घेतल्या आहेत.
ब्रायडन कार्स याचा 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात रीस टोपलीच्या जागी इंग्लंड संघात समावेश करण्यात आला होता. विश्वचषकादरम्यान टोपलीला दुखापत झाली होती. मात्र, विश्वचषकादरम्यान कार्सेला एकही सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं त्याचा 2 वर्षांसाठी केंद्रीय करारामध्ये समावेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकापूर्वी सुरेश रैनानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “भारतीय संघाची जिंकण्याची…”
टी 20 विश्वचषकापूर्वी उद्या (1 जून) रंगणार भारत आणि बांगल्देश यांच्यात सराव सामना
टी20 विश्वचषकासाठी ‘हा’ संघ आहे प्रबळ दावेदार गाठू शकतो अंतिम फेरी