इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज हॅरी गार्नीने शुक्रवारी(14 मे) आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. हॅरी गार्नीला खांद्याच्या दुखापतीपासून बराच काळ त्रास सहन करावा लागत होता. व अखेर या दुखापतीमुळेच गार्नीने अवघ्या 34 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे. गार्नीला मागील वर्षी टी -20 ब्लास्ट दरम्यान दुखापत झाली होती. निवृत्तीनंतर गार्नीने फार भावनिक विधान केले.
निवृत्तीनंतर गार्नी म्हणाला की, ‘आता क्रिकेटचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. मी खांद्याच्या दुखापतीतून सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण तसे होऊ शकले नाही. दुखापतीमुळे कारकिर्द समाप्त होणे खूपच निराशाजनक आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मी पहिल्यांदा बॉल पकडला आणि मला या खेळाचे वेड लागले. मी 24 वर्षे क्रिकेट खेळलो आहे आणि मी हा प्रवास कधीही विसरणार नाही.
गार्नीने 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे गार्नीने 2014 मध्येच इंग्लंडकडून अखेरचा सामनाही खेळला होता. गार्नीने इंग्लंडकडून 10 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. गार्नी जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळला आणि टी20 स्पेशलीस्ट गोलंदाज म्हणून नावारूपाला आला.
गार्नीने मेलबर्न रेनेगेड्ससाठी बिग बॅश लीग स्पर्धा जिंकली आहे. तसेच त्याने बार्बाडोसकडून खेळताना कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा देखील जिंकली आहे. गार्नी 2019 आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. गार्नीने आपल्या कारकीर्दीत एकूण 614 बळी घेतलेले आहेत.
गार्नी आपल्या व्यावसायिक क्रिकेट प्रवासाबद्दल म्हणाला, ‘इंग्लंडकडून खेळणे, आयपीएलमध्ये खेळणे तसेच टी20 ब्लास्ट, बिग बॅश आणि सीपीएलसह देश-विदेशात एकूण 8 ट्रॉफी जिंकणे ही माझ्यासाठी विशेष कामगिरी होती. मी क्रिकेट सोडण्यासाठी नेहमीच मानसिक तयारी केली आहे. आता दुखापतीमुळे माझी कारकीर्द संपुष्टात येत आहे. मला वाटते की दुखापतीतून पुनरागमन करणे म्हणजे डोंगरावर चढण्यासारखे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार