---Advertisement---

सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी

---Advertisement---

मुंबई । आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वी सुरेश रैना ही स्पर्धा न खेळताच मायदेशात परतल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. वैयक्तिक कारणांमुळे रैनाने यावेळी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे रैनाने स्वत: च्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. मात्र, सहा वर्षांपूर्वी सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची भविष्यवाणी करण्यात आली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने ही भविष्यवाणी केली होती.

सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे ट्वीट व्हायरल होत आहे.  2014 मध्ये आर्चरने दोन ट्वीट केले होते. एका ट्वीटमध्ये त्याने लिहिले होते की, “पळू नको रैना,” तर दुसर्‍या ट्वीटमध्ये असे लिहिले होते की, “रैना कसा बाद झाला?”  हे दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते म्हणत आहेत की रैना बाद होण्याबद्दल आर्चरला आधीच माहिती होती.

रैना पुन्हा दुबईला जाणार?

दरम्यान, अचानक आयपीएलमधून माघार घेण्याविषयी प्रतिक्रिया देताना सुरेश रैनाने सांगितले की, “आपण आपल्या कुटूंबासाठी परत आलो. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी दुबईमध्ये पुन्हा चेन्नई सुपर किंग्जमध्ये मी सामील होऊ शकेल.”

सुरेश रैनाने एमएस धोनीसह 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रैनाने, त्याचे आणि फ्रँचायझीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचे खंडन केले.  फ्रेंचायझी संघात कोव्हिड-19 च्या पॉझिटिव्हची 13 प्रकरणे समोर आली. त्यामुळे रैनाने माघार घेतली असे सांगण्यात आले होते.

जोफ्रा आर्चरने आयसीसी विश्वचषक 2019 च्या दरम्यान अंतिम सामन्यात सुपर ओव्हरबद्दल ट्वीट केले होते, तेव्हा तो चर्चेत आला होता. आर्चरने बऱ्याच वर्षांपूर्वी हे ट्वीट केले होते आणि चाहत्यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर ते ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

जोफ्रा आर्चर हा भविष्य सांगणारा खेळाडू असल्याचे चाहते मजेत म्हणतात. सध्या जोफ्रा आर्चर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मालिका आणि वनडे मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सप्टेंबरपासून टी20 मालिका सुरू होणार असून त्यानंतर 11 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने सर्वांसमोर दिली होती गर्लफ्रेंडला शिवी, आता होतं नाहीये लग्न

-न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती

-माझा रैनावर काहीही अधिकार नाही, त्याच्या कमबॅकचा निर्णय घेणार हा व्यक्ती

ट्रेंडिंग लेख-

-दिग्गजाने निवडले ५ भारतीय खेळाडू, जे घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा

-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप

-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---