नवी दिल्ली । क्रिकेट हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये खूप पैसा आहे. नेहमी आपण पाहतो, की एका मध्यम वर्गातील मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताच त्याचे आयुष्य बदलते. खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर त्यांच्यावर कोटी रुपयांची उधळण होते. विराट कोहली, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर हे याचे उदाहरण आहे. तरी काही क्रिकेटपटू असेही आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळूनही कठीण परिस्थितीशी झगडताना दिसतात.
विशेषत: जेव्हा ते क्रिकेटमधून निवृत्ती घेतात, तेव्हा अशा घटना घडताना दिसतात. अशीच एक कहाणी आहे इंग्लंडचा माजी कर्णधार ऍडम हॉलियोकची, ज्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपले कुटुंब सांभाळण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे.
कोण आहे ऍडम हॉलियोक
ऍडमच्या (Adam Hollioake) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात १९९६ मध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला ऍडम इंग्लंडकडून खेळत होता. त्याने इंग्लंडच्या वनडे संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याने इंग्लंडकडून ४ कसोटी सामने आणि ३५ वनडे सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त त्याने काऊंटी संघ सरेला ३ वेळा काऊंटीचे चॅम्पियन बनविले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत प्रथम श्रेणीत एकूण १८ शतकेही ठोकली आहेत.
निवृत्तीनंतर ऍडम झाला ऑस्ट्रेलियाला रवाना
ऍडमचा लहान भाऊ आणि बहिणीचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या मनातून क्रिकेट दूर गेले. तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आणि आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळू लागला. परंतु आर्थिक मंदीमुळे त्याचा संपूर्ण व्यवसाय नष्ट झाला. २०११ पर्यंत तो पूर्णपणे दिवाळखोर झाला. त्याच्याकडे आपले कुटुंब चालविण्यासाठी पैसे नव्हते. यानंतर ऍडमला पैसे कमविण्यासाठी एका व्यक्तीने व्यावसायिक फाईट करण्याचे आमंत्रण दिले. ऍडमने व्यावसायिक फाईटचे प्रशिक्षण घेतले नव्हते. परंतु तरीही तो यासाठी तयार झाला. ऍडम रिंगमध्ये उतरला आणि क्वीन्सलँडमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात कोणीही विजेता ठरला नाही. तो सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर त्याने २०१२मध्ये MMA सामना खेळला आणि आपल्या विरोधी स्पर्धकाला पराभूत केले.
ऍडमने यानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि २०१८मध्ये तो अफगाणिस्तानच्या शपागीजा क्रिकेट लीगमध्ये बूस्ट डिफेंडर्स संघाचा प्रशिक्षक बनला. तो इंग्लंड लायन्सचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणूनही नियुक्त झाला.
ऍडमने संमोहित (Hypnotized) कलादेखील शिकली आहे. परंतु आतापर्यंत त्याने कोणालाही संमोहित केले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-६०० विकेट्स घेणाऱ्या ‘या’ क्रिकेटपटूला एका गुंडाने जेलमधून लिहिले होते अभिनंदनाचे पत्र
-भारत म्हणजे मॅच फिक्सिंगचा अड्डा, पहा कुणी केली ही विषारी टीका
-ड्युमिनी म्हणतो, त्या भारतीय फलंदाजांच्या पुल शाॅटचा दिवाना