Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ प्रकरणी वॉनविरुद्ध बीबीसीची कठोर कारवाई, पण इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आरोपांना म्हटले निराधार

November 26, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/@englandcricket

Photo Courtesy: Twitter/@englandcricket


इंग्लंडचा माजी क्रिकेट कर्णधार मायकेल वॉन याला बुधवारी (२४ नोव्हेंबर) बीबीसीने आपल्या समालोचन पॅनलमधून काढून टाकले आहे. वर्णद्वेषी वक्तव्य केल्याप्रकरणी वॉनवर ही कारवाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी वॉन समालोचन समितीचा भाग होता. मात्र आता तो या मालिकेत समालोचन करू शकणार नाही. मायकेल वॉनने २००९ मध्ये एका सामन्यादरम्यान यॉर्कशायरचा माजी कर्णधार अझीम रफिकवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

बीबीसीने म्हटले की, “मायकेल वॉन क्रिकेटमधील एका वेगळ्याच कथेत गुंतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेच्या कव्हरेजमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या त्याची योग्य वेळ नाही.” विशेष म्हणजे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज नावेद-उल-हसन राणानेही मायकेल वॉनला वर्णद्वेषी टिप्पणी करताना ऐकल्याचे सांगितले होते.

वॉनने स्वत:वरील आरोपांना निराधार म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की, “माझ्या प्रतिष्ठेला खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी आयुष्यात अनुभवलेली ही सर्वात वाईट गोष्ट आहे.”

View this post on Instagram

A post shared by Michael vaughan (@michaelvaughan)

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेन वॉर्न, ऍलन बॉर्डर, मार्क वॉ आणि ऍडम गिलख्रिस्टचा फोटो शेअर करत वॉनने लिहिले की, “ऍशेस मालिकेसाठी टीमएमएसवर समालोचन करता येणार नसल्याने मी खूप निराश आहे. मी माझे महान सहयोगी आणि माझ्या मित्रांसोबत काम करू शकणार नाहीये. परंतु मी ऑस्ट्रेलियात फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करण्याची अपेक्षा करतो. क्रिकेटपुढे येणारे मुद्दे कोणत्याही वैयक्तिक प्रकरणापेक्षा खूप मोठे आहेत. मी समाधानाने याचा भाग बनू इच्छित आहे, स्वतला अजून शिक्षित बनवू इच्छित आहे.”

मायकेल वॉन हा इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. २००४ मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने १८ वर्षांनी ऍशेस मालिका जिंकली होती. वॉनने इंग्लंडचे प्रतिनिधित्त्व करताना ८२ कसोटी सामन्यात ४१.४४ च्या सरासरीने ५७१९ धावा केल्या होत्या. वांशिक टिप्पणीचे प्रकरण समोर आल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यॉर्कशायरला आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यापासून निलंबित केले आहे. त्याच वेळी, यॉर्कशायरशी संबंधित प्रायोजक देखील त्यांच्याशी करार संपवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvNZ, 1st Test, 1st Day: गिल, अय्यर, जडेजाचे दमदार अर्धशतकं; पहिल्या दिवसाखेर भारताच्या ४ बाद २५८ धावा

दुखापतींचा शनी पाठ सोडेना! विजय हजारे ट्रॉफीपूर्वी विजेत्या तमिळनाडूला मोठा धक्का, नटराजन स्पर्धेबाहेर

पंजाब किंग्ज संघाची साथ सोडून केएल राहुल आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ संघात करणार प्रवेश?


Next Post
Photo Courtesy: Instagram/Shreyas Iyer and Team India

श्रेयस अय्यरच्या वडीलांनी गेल्या ४ वर्षांपासून बदलला नव्हता व्हॉट्सअप डीपी, 'हे' होतं मोठं कारण

Photo Courtesy: Twitter/ICC

वॉटसनने निवडले टी२० क्रिकेटमधील टॉप-५ फलंदाज, रोहित नव्हे 'या' भारतीयाला दिली जागा

Photo Courtesy: Twitter/BCCI

रोहितची फिरकी घेणं झहिरला पडलं महागात, एक मुंबईकरच आला रोहितच्या मदतीला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143