इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेला दुसरा वनडे सामना रंगतदार स्थितीत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघ २४६ धावांवर गुंडाळला गेला. परिणामी भारतीय संघाला विजयासाठी २४७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने सर्वाधिक धावा केल्या. खालच्या फळीत फलंदाजीला येत त्याने ६४ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने प्रत्येकी २ षटकार आणि २ चौकार मारले. तसेच त्याच्यात आणि डेविड विलीमध्ये सातव्या विकेटसाठी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. ही इंग्लंडच्या डावातील सर्वोच्च भागीदारीही ठरली. मोईन अलीची विकेट गेल्यानंतर डेविड विलीनेही आक्रमक पवित्रा घेतला आणि ४९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली.
त्यांच्याखेरीज वरच्या फळीत सलामीवीर जॉनी बेयरस्टोने ३८ धावांचे योगदान दिले. तसेच लियाम लिविंगस्टोन (३३ धावा), जेस रॉय (२३ धावा) आणि बेन स्टोक्स (२१ धावा) यांना जास्त धावा करता आल्या नाहीत.
A fantastic spell (4-47) from @yuzi_chahal comes to an end and he gets an applause here at the Lord's.👏
Jonny Bairstow ✔️
Joe Root✔️
Ben Stokes✔️
Moeen Ali✔️https://t.co/N4iVtxsQDF #ENGvIND pic.twitter.com/VoN6FwdWOG— BCCI (@BCCI) July 14, 2022
या डावात भारताकडून फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. ४७ धावा देताना त्याने या विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्यानेही आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला. त्याने संघाला २ विकेट्स मिळवून दिल्या. जसप्रीत बुमराहने २ आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बलाढ्य इंग्लंडच्या त्रिकुटावर भारी पडला चहल, टीम इंडियाला मिळून दिल्या महत्वाच्या विकेट्स
बाबा बनलो रे! दुसऱ्यांदा सीएसकेचा रॉबिन उथप्पा बनला वडील, नवजात मुलीचं नावही केलंय रिव्हील